Corona Cases in Akola : आणखी दोघांचा मृत्यू, ६३ कोरोना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 17:50 IST2021-06-15T17:50:32+5:302021-06-15T17:50:54+5:30
Corona Cases in Akola: जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने एकूण कोरोनाबळींचा आकडा १,११६ वर पोहोचला आहे.

Corona Cases in Akola : आणखी दोघांचा मृत्यू, ६३ कोरोना पाॅझिटिव्ह
अकोला : जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरली असून, मंगळवार, १५ जून रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २९, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ३४ असे ६३ नवे रुग्ण आढळून आल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५७२२३ झाली आहे. जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने एकूण कोरोनाबळींचा आकडा १,११६ वर पोहोचला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ७३६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, उर्वरित ७०७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मंगळवारी दिवसभरात दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये हिवरखेड ता. तेल्हारा येथील ४८ वर्षीय पुरुष व बाभूळगाव येथील ७८ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. दोघांनाही अनुक्रमे १२ व ४ जून रोजी दाखल करण्यात आले होते.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
मुर्तिजापूर-चार, बार्शीटाकळी-दोन, बाळापूर-तीन, अकोट-पाच, तेल्हारा-चार, अकोला-११. (अकोला ग्रामीण-पाच, अकोला मनपा क्षेत्र-सहा)
११८ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सहा, खासगी कोविड रुग्णालयांमधून २४, तर होम आयसोलेशन मधील ९० अशा एकूण ११८ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.
१,२३३ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७,२२३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५४,८७४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,११६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,२३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.