Corona Cases : अकोल्यात आणखी पाच जणांचा मृत्यू, १८८ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 11:53 AM2021-04-12T11:53:27+5:302021-04-12T11:53:56+5:30
Corona Cases in Akola : १२ एप्रिल रोजी आणखी पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ५१३ झाला आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, साेमवार, १२ एप्रिल रोजी आणखी पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ५१३ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ९४ तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये ९४ अशा १८८ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ३१,०१५ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४६८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १८८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३७४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये कौलखेड येथील सात, खडकी येथील सहा, मोठी उमरी व पारस येथील प्रत्येकी पाच, कच्ची खोली येथील चार, मलकापूर, आदर्श कॉलनी व विवरा येथील प्रत्येकी तीन, रजपूतपुरा, सिव्हील लाईन, गौतम नगर, डाबकी रोड, मोठा राम मंदिर, आश्रय नगर, संताजी नगर, रमेश नगर, पक्की खोली व भंडारज बु. येथील प्रत्येकी दोन, देशमुख पेठ, जूने आळसी बाजार, मेहबुबनगर, वारेगाव मंजू, टॉवर चौक, कृषी नगर, जूने शहर, रानी हेरिटेज, भगीरथ नगर, लहान उमरी, खोलेश्वर, जठारपेठ, दुर्गाचौक, सूधीर कॉलनी, बाळापूर रोड, भरतपूर ता.बाळापूर, मो.अली रोड, जैन मंदिर, देवी खदान, नागपूरी जिन, दामिनी हॉस्पीटल मागे, केशवनगर, हिरपूर ता.मुर्तिजापूर, मालीपूरा, अकोटफैल, रणपिसे नगर, पैलपाडा, रामनगर, भारती प्लॉट, हरिहर पेठ, लोकमान्य नगर, खदान, हिंगणा रोड, गोरक्षण रोड, तांडाली, महात्मा फुले, किर्ती नगर व बलवंत नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
तीन महिला, दोन पुरुष दगावले
डाबकी रोड येथील ५० वर्षीय महिला, मुर्तिजापूर येथील ७० वर्षीय महिला, गॅलेक्सी पार्क, हिंगणा येथील ८२ वर्षीय पुरुष, शिवणी येथील ९२ वर्षीय महिला व पंचशील नगर येथील ६५ वर्षीय पुरुष अशा पाच जणांचा सोमवारी उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
४,०९२ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३१,०१५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २६,४१० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ५१३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४,०९२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.