Corona Cases : आणखी नऊ जणांचा मृत्यू, ४९४ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 07:14 PM2021-04-24T19:14:21+5:302021-04-24T19:14:28+5:30
Corona Cases: आणखी नऊ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा ६१९ झाला आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शनिवार, २४ एप्रिल रोजी आणखी नऊ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा ६१९ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३८०, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ११४ पॉझिटिव्ह आढळून आल्याने आतापर्यंत बाधित होणार्यांची एकूण संख्या ३७,२३० झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २१८८ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ३८० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १८०८ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये
मुर्तिजापुर तालुक्यातील २५, अकोट तालुक्यातील ८६, बाळापूर तालुक्यातील २६, तेल्हारा तालुक्यातील १६, बार्शी टाकळी तालुक्यातील नऊ, पातूर तालुक्यातील २७ व अकोला १९१ (अकोला ग्रामीण-१८, अकोला मनपा क्षेत्र-१७३) रुग्णांचा समावेश आहे.
सहा महिला, तीन पुरुष दगावले
- मलकापूर येथील ५८ वर्षीय महिला
- कारंजा ता.मुर्तिजापूर येथील ५० वर्षीय महिला
- दहिगाव, बोरगाव मंजू येथील ६५ वर्षीय महिला
- खदान येथील ६९ वर्षीय पुरुष
- मोठी उमरी येथील ६७ वर्षीय महिला
- वलगाव ता. बाळापूर येथील ४० वर्षीय पुरुष
- शिवर येथील ६५ वर्षीय पुरुष
- चोहट्टा बाजार येथील ६४ वर्षीय महिला
- महान येथील ५२ वर्षीय महिला
रॅपिडमध्ये ११४ पॉझिटिव्ह
अकोट येथे पाच, बार्शीटाकळी येथे नऊ, पातूर येथे पाच, तेल्हारा येथे सहा, मुर्तिजापूर येथे २७, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये एक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४०, र हेडगेवार लॅब येथे १९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.
५९४ कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३५, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, ओझोन हॉस्पीटल येथील एक, युनिक हॉस्पीटल येथील दोन, अकोला ॲक्सिडेंट येथील दोन, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय एक, सहारा हॉस्पीटल येथील दोन, पाटील हॉस्पीटल येथील दोन, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, उपजिल्हा रुग्णालय येथील एक, देवसार हॉस्पीटल येथील तीन, नवजीवन हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर अकोट येथील एक, तर होम आयसोलेशन मधील ५३५ असे एकूण ५९४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६,३१३ रुग्ण उपचाराधीन
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३७,२०३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ३०,२७१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ६१९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,३१३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.