Corona Cases : अकोला जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू, ३७६ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 07:02 PM2021-03-28T19:02:40+5:302021-03-28T19:02:50+5:30
CoronaVirus News रविवार, २८ मार्च रोजी आणखी तिघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ४४६ झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी खंडीत होण्याची कोणतीही चिन्हे नसून, रविवार, २८ मार्च रोजी आणखी तिघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ४४६ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २५८, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ११८ असे एकूण ३७६ रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांचा आकडा २७,२०० वर पोहोचला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,५६८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २५८जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १३१० अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तेल्हारा व पारस येथील प्रत्येकी ११, पळसखेड व मलकापूर येथील प्रत्येकी आठ, कौलखेड येथील सहा, गोरक्षण रोड, शिवर व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, खडकी, डाबकी रोड, कुंभारी, एमआयडीसी व गोकूल कॉलनी येथील प्रत्येकी चार, शिवसेना वसाहत, दानापूर, जीएमसी, अकोट, येवता, लहान उमरी, मोठी उमरी व जवाहर नगर येथील प्रत्येकी तीन, गाडगे प्लॉट, हरिहर पेठ, शास्त्री नगर, नवरंग सोसायटी, गीता नगर, वाशिम बायपास, बार्शीटाकळी, तुकाराम चौक, पातूर, सिंधी कॅम्प, बाळापूर व व्हीएचबी कॉलनी येथील प्रत्येकी दोन, मडकेवाडी, हमजा प्लॉट, चाँदखॉ प्लॉट, देशपांडे प्लॉट, आयकॉन हॉस्पिटलजवळ, गणपती गल्ली, खरप, मुर्तिजापूर, वरखेड, खिरपूर बु., टाकळी, ताजनगर, इंद्रायणी कॉलनी, हिंगणा, आरटीओ रोड, श्रद्धा नगर, रामदासपेठ, राधाकिसन प्लॉट, गड्डम प्लॉट, आदर्श कॉलनी, जूने शहर, स्नेहा नगर, खोलेश्वर,माणिक टाँकीज, बोरगाव मंजू, बाबुळगाव जहॉगीर, वाजेगाव, नया अंदुरा, अमंतपूर, विझोरा, गुडधी, बिर्ला रेल्वे क्वॉटर, पनखेड, तापडीया नगर, चांदुर, सावंतवाडी, कंवरनगर, नयागाव, बाळापूर नाका, लेडी हार्डींग, बाबुळगाव, बाळापूर रोड, वनी, पिंपळखुटा, हिंगणा, जैन चौक, पंचशिल नगर व तारफैल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
सायंकाळी बार्शीटाकळी व रामदासपेठ येथील प्रत्येकी पाच, गोयनका नगर व मलकापूर येथील प्रत्येकी चार, कौलखेड, डाबकी रोड व राऊतवाडी येथील प्रत्येकी तीन, सिंधी कॅम्प, गायगाव, जूने शहर, महान, कृषी नगर, जठारपेठ, अशोक वाटीका, गायगाव व पिंपळखुटा येथील प्रत्येकी दोन, कॉग्रेस नगर, नांदखेड, खदान, अकोट, दहिहांडा, मारोती नगर,गंगा नगर, श्रीहरी नगर, हिरपूर, पुरणखेड, समता नगर, खरप ढोरे, स्टेशन एरिया, काटेपुर्णा, शेलू बाजार, तळेगाव, दगडपारवा, सहकार नगर, तापडीया नगर, विकास नगर, रामकृष्ण नगर, रणपिसे नगर, केलपाणी, सिटी कोतवाली, रेणूका नगर, बलोदे लेआऊट, खोलेश्वर, शिवसेना वसाहत, शिवाजी नगर, रजपूतपुरा, गुलजारपुरा, रिधोरा, केशव नगर, चोहट्टा बाजार, नेरधामणा, रामनगर, जीएमसी व कैलास टेकडी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
दोन महिला, एका पुरुषाचा मृत्यू
रविवारी सायंकाळी तिघांचा मृत्यू झाला. कैलास टेकडी, अकोला येथील ६३ वर्षीय महिला व ३५ वर्षीय अनोळखी पुरुष रुग्णास २८ मार्च रोजी मृतावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच गंगानगर, अकोला येथील ६८ वर्षीय महिला रुग्णाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. या महिलेस २३ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.
५२५ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४४, हॉटेल स्कायलार्क येथून आठ, इंद्रा हॉस्पीटल येथून दोन, सहारा हॉस्पीटल येथून एक, खैर उम्मत हॉस्पीटल येथून दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथील तीन, आर्युवेदिक महाविद्यालय येथील सहा, बिहाडे हॉस्पीटल येथून नऊ, अकोला ॲक्सीडेंट येथून दोन, यकिन हॉस्पीटल येथून तीन, नवजीवन हॉस्पीटल येथून सहा, अवघाते हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, ओझोन हॉस्पीटल येथून पाच, तर होम आयसोलेशन येथील ४२४ अशा एकूण ५२५ जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.
६,४९४ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २७,२०० जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २०,२६० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४४६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,४९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.