Corona Cases : आणखी दोघांचा मृत्यू, २५६ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 07:11 PM2021-03-31T19:11:11+5:302021-03-31T19:11:17+5:30
CornaVirus in Akola ३१ मार्च रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ४५३ झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, बुधवार, ३१ मार्च रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ४५३ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २३७, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ११९ अशा एकूण २५६ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने आतापर्यंतच्या एकूण बाधितांचा आकडा २७,७०० वर गेला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ९१८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९१जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७८१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मलकापूर येथील सात, जठारपेठ येथील पाच, मोठी उमरी व केशव नगर येथील प्रत्येकी चार, गोरक्षण रोड, रामदासपेठ व बाळापूर येथील प्रत्येकी तीन, उरळ, अकोट, देवरी, पारस, न्यू तापडिया नगर, लहान उमरी, निबंधे प्लॉट, जुने शहर, राऊतवाडी, जीएमसी, तोष्णीवाल लेआऊट, राम नगर व शिवणी येथील प्रत्येकी दोन, कृषी नगर, खंडाळा, एमआयडीसी, मिर्झापूर, भौरद, मनारखेड, शेळद, कादवी, देशमुख फैल, बिर्ला राम मंदिर, रामगाव, गजानन नगर, डाबकी रोड, सांगळूद, कोठारी वाटीका, बार्शीटाकळी, तुकाराम चौक, कौलखेड, टॉवर चौक, पारस, हिंगणा रोड, आदर्श कॉलनी, विजय नगर, शंकर नगर, पातूर, तारफैल, घुसर, अयोध्या नगर, आयुर्वेदिक कॉलज, सिव्हिल लाईन, निंभा ता.मूर्तिजापूर, शिवापूर, खडकी, बालाजी नगर, राधाकृष्ण टॉकीज व कुंभारी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
सायंकाळी बार्शीटाकळी येथील पाच, डाबकी रोड येथील चार, तारफैल येथील तीन, तुकाराम चौक व कौलखेड येथील प्रत्येकी दोन, म्हैसपूर, प्रतिकनगर, आसरा कॉलनी, पंचशील नगर, आगर, तेल्हारा, बाळापूर, शिवणी, अनिकट, खोलेश्वर, नवरंग सोसायटी, गौरक्षण रोड, आळशी प्लॉट, शिवनगर, रजपूतपुरा, मोठी उमरी, अयोध्या नगर, गंगा नगर, विजय नगर, गोकूल कॉलनी, शिवाजी पार्क, दुर्गा चौक, तोष्णीवाल लेआऊट, रतनलाल प्लॉट, अंभोरा, गणेश नगर, समता नगर, पळसोळा, माना व राहित येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
दोघांचा मृत्यू
कोरोनावर उपचार सुरू असलेल्या बोलके प्लॉट, अकोट येथील ७० वर्षीय महिलेचा बुधवारी मृत्यू झाला. त्यांना २२ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. सायंकाळी व्दारका नगरी, अकोला येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णास २३ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.
७८९ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३५, सहारा हॉस्पीटल येथील तीन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, युनिक हॉस्पीटल येथील दोन, अकोला ॲक्सीडेंट येथील दोन, खैर उम्मीद हॉस्पीटल सोनोरी मुर्तिजापूर येथे दोन, हारमोनी हॉस्पीटल येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील तीन, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील तीन, बाईज हॉस्टेल अकोला येथील आठ, नवजीवन हॉस्पीटल येथील पाच, ओझोन हॉस्पीटल येथील पाच, आर्युवेदिक महाविद्यालयातून १७, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, कोविड केअर सेंटर अकोट येथील तीन, इंद्रा हॉस्पीटल येथील तीन, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथील आठ, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन येथील ६७१ अशा एकूण ७८९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
५,७८४ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २७,७०० जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २०,४६३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४५२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५,७८४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.