कोरोनामुळे ऐन लग्नसराईत व्यवसाय ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:17 AM2021-04-05T04:17:07+5:302021-04-05T04:17:07+5:30
वाडेगाव: कोरोनामुळे अनेक व्यवसाय ठप्प पडले आहेत. कोरोनाचा फटका लग्नसराईत व्यवसाय करणाऱ्यांना बसला आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात ...
वाडेगाव: कोरोनामुळे अनेक व्यवसाय ठप्प पडले आहेत. कोरोनाचा फटका लग्नसराईत व्यवसाय करणाऱ्यांना बसला आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक छोटे मोठे व्यवसायिकांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आल्याचे चित्र निर्माण झाले.
उन्हाळ्यात लग्नसराई मोठ्या प्रमाणात असते. शुभमंगल कार्यक्रमामुळे अनेकांना रोजगार प्राप्त होतो. मात्र कोरोनामुळे मार्च महिना संपला असून व्यवसाय ठप्पच आहेत. बँड, ढोल, डीजे, शामियाना,
जलसेवा, छायाचित्रकार, वाहनचालक, फेटे व्यावसायिक, मेहंदी डिझायनर, रांगोळी, घोडीवाले, सजावट आदी व्यायसायिकांचे व्यवसाय ठप्प असल्याने ते चिंतेत सापडले आहेत. लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात साजरे होत असतात, परंतु सद्यस्थितीत कोरोनामुळे लग्न समारंभ जवळपास रद्द करण्याची वेळ उपवर मुली-मुलांच्या पालकांवर येऊन ठेपली आहे. परिणामी, लग्न समारंभाचे महत्वपूर्ण घटक असलेल्या सर्व व्यवसायीकावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये विशेषतः लग्न समारंभात मंडप व्यावसायिक, बॅन्ड पथक, छायाचित्रकार व्यवसाय ठप्प पडले आहे. या व्यावसायिकांना शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी वाडेगाव येथील छायाचित्रकार नारायण सोनोने, चेतन महल्ले, राजू साबळे, प्रकाश तायडे, अशोक तायडे, संतोष सोनोने, सावन गवई, प्रमोद बेलोकार, गणेश महल्ले, सतीश गायकवाड, रूपराव तायडे, जयंत अंभोरे, प्रल्हाद चौके, प्रमोद मोरे, अमोल हातोले, संकेत सुरवाडे, नीलेश इंगळे, मनोज किरतकर, मंडप संचालक गोपाळ वाघ, सचिन कचाले, शिव घाटोळ, विकी जंजाळ, मंगेश तायडे, सुनील बंड आदी व्यासायिकांनी केली आहे.