कोरोनाने घेतला आणखी नऊ जणांचा बळी, २८४ नव्याने पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 05:19 PM2021-04-11T17:19:08+5:302021-04-11T17:19:14+5:30
CoronaVirus News : रविवार, ११ एप्रिल रोजी आणखी नऊ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ५०८ झाला आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, रविवार, ११ एप्रिल रोजी आणखी नऊ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ५०८ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २०४ तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ८० अशा २८४ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ३०,७१२ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,५५७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २०४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित् १,३५३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये पारस येथील १६, अकोट येथील १४, कौलखेड येथील १०,पातूर, बाळापूर येथील प्रत्येकी नऊ, मुर्तिजापुर,साहित, गोरक्षण रोड येथील प्रत्येकी सात, तेल्हारा येथील सहा, डाबकी रोड, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी पाच, जीएमसी, शास्त्रीनगर येथील चार, तरोडा खानापुर, एन पी कॉलनी, मलकापूर, लोणी कदमपूर येथील प्रत्येकी तीन, कापशी, गजानन नगर, गोकुळ कॉलनी, कीर्ती नगर, शिवर, लहान उमरी, देऊळगाव, खडकी येथील प्रत्येकी दोन, खदान, निंबी, दहातोंडा, कन्हेरी सरप, नवापूर, चिखलगाव, विझोरा, हिंगणा, आलेगाव, शिवनार, बारालिंगा, पास्टुल, देवी खदान, राधाकिसन प्लॉट, तापडीया नगर, न्यू तापडीया नगर, तारफाईल, जठारपेठ, महान, बेलुरा, बार्शीटाकळी, श्रीराम नगर, महसूल कॉलनी, वरुर, वलवाडी, रविनगर, बोरगाव मंजू, अमान खा प्लॉट, साई नगर, आदर्श कॉलनी, रेणूका नगर, कासरखेड, जवाहर नगर, गीतानगर, खडकी, बटवाडी, चांदूर, आरोग्य नगर, कासुरा, रणपिसेनगर, गायत्री नगर, बालाजी नगर, चैतन्यवाडी, देशमुख फाईल, जुने शहर, गोडबोले प्लॉट, अनिकट, हरिहर पेठ, शिवसेना वसाहत, रजपुत पुरा, बंजारा नगर, अकोट फाईल, तोष्णिवाल ले आऊट, मोठी उमरी आणि उगवा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
पाच महिला, चार पुरुषांचा मृत्यू
खडकी येथील ४५ वर्षीय महिला, खरप येथील ५८ वर्षीय महिला, जठारपेठ येथील ५४ वर्षीय पुरुष, वाडेगाव ता. बाळापूर येथील ६९ वर्षीय महिला, अकोट येथील ७५ वर्षीय महिला, डाळंबी येथील ६५ वर्षीय पुरुष, विवरा ता. पातूर येथील ६७ वर्षीय पुरुष, मोठी उमरी येथील ५० वर्षीय महिला आणि वाडेगाव ता. बाळापुर येथील ३२ वर्षीय पुरुष अशा नऊ रुग्णांचा कोरोनावर उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
४,०१३ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३०,७१२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २६,१९१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ५०८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४,०१३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.