‘कोरोना’ नियंत्रणाच्या उपाययोजनांवर सप्टेंबर अखेरपर्यंत ३.४९ कोटी खर्च!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 11:37 AM2020-10-04T11:37:27+5:302020-10-04T11:37:38+5:30
Corona control measures ३ कोटी ४९ लाख ९५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.
अकोला: जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्याच्या उपाययोजनांसाठी शासनाकडून ३ कोटी ८० रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, विविध यंत्रणांना वितरित करण्यात आलेल्या या निधीपैकी सप्टेंबर अखेरपर्यंत ३ कोटी ४९ लाख ९५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. उपलब्ध निधीतून यंत्रणांमार्फत जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांची कामे करण्यात आली.
कोरोना विषाणूचा जिल्ह्यातील वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी तसेच वाढती रुग्णसंख्या व मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत गेल्या सात महिन्यांपासून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांकरिता १७ मार्च ते २४ जुलै दरम्यान शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला ३ कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. उपलब्ध निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांना वितरित करण्यात आला.
वितरित करण्यात आलेल्या निधीमधून संबंधित यंत्रणांकडून जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रित करण्याच्या उपाययोजनांसाठी सप्टेंबर अखेरपर्यंत ३ कोटी ४९ लाख ९५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. त्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची कामे करण्यात आली.
जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांकरिता शासनाकडून ३ कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. त्यापैकी आतापर्यंत ३ कोटी ४९ लाख ९५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.
-संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी.