अकोल्यात कोरोनाबळींचा उच्चांक, बुधवारी १७ जणांचा मृत्यू, ७५४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 10:32 AM2021-04-22T10:32:51+5:302021-04-22T10:32:58+5:30

Corona update Akola : कोरोनाने बुधवारी आणखी १७ जणांचा बळी घेतला असून ७५४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

Corona death toll rises to 17 in Akola, 754 positive | अकोल्यात कोरोनाबळींचा उच्चांक, बुधवारी १७ जणांचा मृत्यू, ७५४ पॉझिटिव्ह

अकोल्यात कोरोनाबळींचा उच्चांक, बुधवारी १७ जणांचा मृत्यू, ७५४ पॉझिटिव्ह

Next
ref='https://www.lokmat.com/topics/akola/'>अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला असून मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. कोरोनाने बुधवारी आणखी १७ जणांचा बळी घेतला असून ७५४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये आरटीपीसीआरचे ५७३, तर रॅपिड ॲन्टिजेनचे १८१ पॉझिटिव्ह अहवाल आहेत. दिवसभरातील मृत्यू आणि रुग्णसंख्या हे आतापर्यंतचे उच्चांकी आकडे असून जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अकोलेकरांना घरातच थांबा, असा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जात आहे. कोरोनाचा कहर सुरूच असून बुधवारी आणखी १७ जणांचा बळी गेला आहे. यामध्ये वाडेगाव येथील २८ वर्षीय महिलेसह हाजी नगर येथील ५४ वर्षीय पुरुष, राहुल नगर येथील ३२ वर्षीय पुरुष, मालेगाव ता. तेल्हारा येथील ४५ वर्षीय पुरुष, शिवर येथील ५२ वर्षीय महिला, शिवनी येथील ७१ वर्षीय पुरुष, शिसामासा येथील ५० वर्षीय पुरुष, शेकापूर ता. पातूर येथील ७२ वर्षीय पुरुष, गड्डम प्लॉट येथील ७५ वर्षीय महिला, दहिहांडा ता. अकोट येथील ७८ वर्षीय पुरुष, व्हीएचबी कॉलनी येथील ४२ वर्षीय पुरुष, वानखडे नगर येथील ३१ वर्षीय पुरुष, वस्तापूर ता. अकोट येथील ३२ वर्षीय पुरुष, मुर्तिजापूर येथील ५२ वर्षीय महिला, वृंदावन नगर येथील ५४ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. यासह खासगी रुग्णालयातून दोघांचे मृत्यू झाले. त्यात आळसी प्लॉट येथील ६० वर्षीय पुरुष, तर पातूर येथील ४२ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यूचा आकडा ५९५ वर पोहोचला असून, बाधितांचा आकडा ३५४३७ वर पोहोचला आहे. सद्यस्थितीत ५५९९ रुग्णांवर कोविडचा उपचार सुरू असून, यातील बहुतांश रुग्ण गृह विलगीकरणात दाखल आहेत. तालुकानिहाय रुग्णसंख्या (आरटीपीसीआर अहवालानुसार) तालुका - रुग्णमुर्तिजापूर - ०४ अकोट - ९३बाळापूर - ४५ तेल्हारा - ०६बार्शिटाकळी - १८ पातूर - ५७अकोला - ३५० (ग्रामीण ३४, मनपा-३१६) १३१ रुग्णांना डिस्चार्ज रुग्णसंख्या वाढीच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या खालावली आहे. बुधवारी १३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, यापैकी ३७ रुग्ण गृह विलगीकरणातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २९ हजार २४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.३७

Web Title: Corona death toll rises to 17 in Akola, 754 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.