कोरोनाचा कहर : दहा जणांचा मृत्यू, ६५६ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:18 AM2021-04-18T04:18:07+5:302021-04-18T04:18:07+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २,१५१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

Corona devastation: 10 killed, 656 positive | कोरोनाचा कहर : दहा जणांचा मृत्यू, ६५६ पॉझिटिव्ह

कोरोनाचा कहर : दहा जणांचा मृत्यू, ६५६ पॉझिटिव्ह

Next

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २,१५१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,७१३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये कौलखेड येथील २०, अकोट येथील १६, गोरक्षण रोड येथील १३, मोठी उमरी येथिल १२, मलकापूर येथील नऊ, बालापूर........................ येथील आठ, शिवर, मुर्तिजापूर येथील प्रत्येकी सात, आदर्श कॉलनी येथील सहा, रणपिसेनगर, व्हीएचबी कॉलनी, सिंधी कॅम्प, डाबकी रोड, येथील प्रत्येकी पाच, गीतानगर, पातूर, टाकळी बु., खडकी, राहेर, बेलखेड, जीएमसी येथील प्रत्येकी चार, तेल्हारा, सुधीर कॉलनी, हिंगणा रोड, खेतान नगर, लहान उमरी, जठारपेठ, देशमुख फाईल, लक्ष्मीनगर, पाटीलमंडळी, चोहोट्टा, जांभा खु. येथील प्रत्येकी तीन, व्याळा, रामनगर, गजानन नगर, गणेशनगर, अमानखा प्लॉट, टाकळी खु., शिवापूर, गावंडगाव, दहीगाव, तुकाराम चौक, अंबिका नगर, जवाहर नगर, उगवा, जीएमसी गर्ल होस्टेल, तोष्णिवाल ले-आऊट, पारस, रतनलाल प्लॉट, राऊतवाडी, तापडियानगर, गड्डम प्लॉट येथील प्रत्येकी दोन, जयरामसिंग प्लॉट, गुरुदेव नगर, दसेरा नगर, पोळा चौक, बाभूळगाव, डोंगरगाव, गोकुळ कॉलनी, मजलापूर दापुरा, बोरगावमंजू, बोरगाव, भीमनगर, आळशी प्लॉट, दुर्गा चौक, नकाशी, जुना आरटीओ रस्ता, पिंजर, राहित, चांदूर, गोपाळखेड, मोरगाव भाकरे, नवीन आरटीओ, केडिया प्लॉट, शास्त्री नगर, सस्ती, सांगवामेळ, शिरताळा, मनब्दा, सहकार नगर, शिवसेना वसाहत, शिवनगर, चिखली, पाचपूळ, मुळशी, विवरा, कृषिनगर, दहिहांडा, शिवनी शिवर, नायगाव, तळेगाव बाजार, करोडी, वरखेड, खांडकेश्वर वेताळ, विझोरा, चांगेफळ, आगिखेड, शेकापूर, शिर्ला, सिदाजीवेताळ, उमरा, कोठारी, जांब, टाकिया, दानपूर, वरखेड, निंबोरा, खेलदेशपांडे, लोहारी, लाडेगाव, पिंपरी खु., आंबोडा, आलेवाडी, शिवनापूर, कच्ची खोली, आरोग्य कॉलनी, राजीव गांधी नगर, दापुरा, गाडगेनगर, नेहरू पार्क, गायत्री बालिकाश्रम, दत्त कॉलनी, सिद्धार्थ नगर, सोनाळा, कुंभारी, एमआयडीसी, कोणार, रामदासपेठ, धानेगाव, शेळद, रंभापूर, कासारखेड, दिनोडा, ज्योती नगर, मुंगशी, हातगाव, सुकळी, हरिहरपेठ, रिंगरोड, जुनेशहर, तारफाईल, पोलीस हेड क्वाॅर्टर, चिखलगाव, बंजारा नगर, कळंबेश्वर, अशोकनगर आणि संतोषनगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी जांभरुण येथील १९, मुर्तिजापूर येथील १२, वसाली पातूर येथील ११, खडकी येथील सात, सगड येथील सहा, दहातोंडा व सांगवी येथील प्रत्येकी चार, शिरताळा, मराठा नगर, तुकाराम चौक, गोरक्षण रोड, पक्की खोली येथील प्रत्येकी तीन, बार्शी टाकळी, आदर्श कॉलनी, चांदूर, कच्ची खोली, गिरी नगर येथील प्रत्येकी दोन, मनारखेड, पारस, समशेरपूर, चिखली कडवी, बोरगाव खु., हिरापूर, दाताळा, कोलंबी, धनज खु., करुम, कवठा सोपीनाथ, भीमनगर, अन्वी मिर्जापूर, धानोरा, आपातापा, वाशीम बायपास, सांगवी मोहाडी, वरखेड, सराळा, आळंदा, राजंदा, अजनी बु., दोनद, पुनोती बु., गजानन नगर, जीएमसी, उमरी, कौलखेड, न्यू तापडिया नगर, आझाद कॉलनी, वर्धमान नगर, खदान, कृषिनगर, शिवाजी नगर, गीतानगर, महसूल कॉलनी, सिंधी कॅम्प, न.प. कॉलनी, पावसाळे ले-आऊट येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

दोन महिला, दोन पुरुषांचा मृत्यू

विजय नगर येथील ५१ वर्षीय पुरुष, पळसो बढे येथील ६८ वर्षीय महिला, चिवचिव बाजार येथील ६० वर्षीय महिला, मुर्तिजापूर येथील ६१ वर्षीय महिला, अकोला शहरातील ७० वर्षीय महिला, नगरपरिषद कॉलनी येथील ६० वर्षीय महिला, विवरा येथील २५ वर्षीय महिला, पारस येथील ४० वर्षीय महिला, नगर परिषद कॉलनी येथील ६५ वर्षीय महिला व शिवसेना वसाहत येथील ६२ वर्षीय पुरुष अशा दहा जणांच्या मृत्यूची नोंद शनिवारी झाली.

३९२ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५४, सामंत्र हॉस्पिटल येथून एक, आरकेटी महाविद्यालय येथून नऊ, इंदिरा हॉस्पिटल येथून दोन, सहारा हॉस्पिटल येथून दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून तीन, अकोला ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथून एक, आयकॉन नऊ, बार्शीटाकळी कोविड केअर सेंटर येथून पाच, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून दोन, तेल्हारा कोविड केअर सेंटर येथून दोन, जिल्हा स्त्री रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथून पाच, नवजीवन हॉस्पिटल येथून सात, बिहाडे हॉस्पिटल येथून पाच, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, समाजकल्याण मुलांचे वसतिगृह येथून चार, अकोट कोविड केअर सेंटर येथून चार, युनिक हॉस्पिटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून चार तर देवसर हॉस्पिटल येथून तीन, होम आयसोलेशन मधील २६७ अशा एकूण ३९२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

४,३०९ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३३,२७५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २८,४११ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ५५५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४,३०९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Corona devastation: 10 killed, 656 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.