अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच : दिवसभरात ३ मृत्यू; २० पॉझिटिव्ह, मृतकांचा आकडा २८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 07:10 PM2020-05-26T19:10:29+5:302020-05-26T19:19:37+5:30
बाळापूरातील एक व अकोला शहरातील दोन अशा एकून तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांच्या बळींची संख्या २८ वर गेली आहे.
अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, मंगळवार, २६ मे रोजी दिवसभरात ३ मृत्यू व २० नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. बाळापूरातील एक व अकोला शहरातील दोन अशा एकून तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांच्या बळींची संख्या २८ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही ४३५ झाली आहे. दरम्यान, आज दुपारी ३८ जणांना ‘डिस्चार्ज’ देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ११८ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. विदर्भात आता सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आता अकोल्यातील आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल प्रयोगशाळेकडून मंगळवारी दिवसभरात ३१५ संदिग्ध रुग्णांची वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले आहे. यामध्ये २० पॉझिटिव्ह, तर तब्बल २९५ निगेटिव्ह आहेत. यामध्ये १७ पुरुष व तीन महिला रुग्णांचा समावेश आहे. सकाळी पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांमध्ये तीन जण मलकापूर, तीन जण सिंधी कॅम्प येथील तर उर्वरित प्रत्येकी नवाबपुरा, अकोट फैल, बाळापूर रोड, शिवाजी पार्क, राऊतवाडी, सतरंजपूरा,बाळापूर, पिंजर ता. बार्शीटाकळी, येथील रहिवासी आहेत. तर सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये पाच जण हे हरिहर पेठ अकोला येथील रहिवासी आहेत. तर उर्वरित दोघे जण आंबेडकर नगर अकोट फैल व सबेरी मशिद अकोट फैल येथील रहिवासी आहेत. यात अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या एका मयत रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, बाळापूर येथील एका ५६ वर्षीय पुरुष रुग्णाचा सोमवरी रात्री मृत्यू झाला. तर मंगळवारी जुनेशहरातील अगरवेस भागातील ६६ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एक सबेरी मशिद अकोट फैल येथील ७१ वर्षीय रुग्णाचा मृत्यू रविवार, २४ मे रोजी झाला होता. या दोघांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात कोरोनाबाधितांंच्या मृत्यूचा आकडा आता २८ झाला असून, यामध्ये एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत २८९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत ११८ रुग्ण उपचारार्थ दाखल असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मंगळवारी ३८ जणांना डिस्चार्ज
मंगळवारी दुपारी ३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील ३६ जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.तर उर्वरित दोघांना घरी सोडण्यात आले. यात १७ महिलांचा समावेश आहे. हे सर्वजण डाबकी रोड येथील चार, खदान येथील तीन, मलकापूर दोन, फिरदौस कॉलनी दोन, सोनटक्के प्लॉट दोन, न्यु तारफैल सहा, तेल्हारा दोन, जोगळेकर प्लॉट डाबकी रोड दोन, तर जुने शहर, लकडगंज, रामदास पेठ, चांदखां प्लॉट, दसेरा नगर, देशमुख फैल, सिव्हील लाईन, भिमनगर अकोट फैल , अडगाव, नायगाव, मोमीनपुरा, आगरवेस, अकोट फैल हाजीनगर, मोहम्मद अली रोड, सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहेत.
प्राप्त अहवाल-३१५
पॉझिटीव्ह-२०
निगेटीव्ह-२९५
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-४३५
मयत-२८(२७+१),डिस्चार्ज-२८९
दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-११८