Corona Efect : कृषी पदवीचे प्रवेश लांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 05:09 PM2020-03-29T17:09:56+5:302020-03-29T17:10:02+5:30

कोरानामुळे सर्वच स्पर्धा परीक्षा लांबल्याने त्याचा परिणाम कृषी अभ्यासक्रम प्रवेशावरही होणार असल्याचे वृत्त आहे.

Corona Efect: Admission process of Bachelor of Agriculture Degree will defferd | Corona Efect : कृषी पदवीचे प्रवेश लांबणार

Corona Efect : कृषी पदवीचे प्रवेश लांबणार

Next

अकोला : कोरानामुळे सर्वच स्पर्धा परीक्षा लांबल्याने त्याचा परिणाम कृषी अभ्यासक्रम प्रवेशावरही होणार असल्याचे वृत्त आहे. १२ विच्या परीक्षा संपल्यानंतर वैद्यकीय,अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठीची ‘नीट’‘सीईटी’ परीक्षा घेतल्या जाते.याच धरतीवर कृषी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचीही ‘सीईटी’ महाराष्ट्र (एमसीईएआर) कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडून कृषी विद्यापीठ स्तरावर ही घेतल्या जात होेती.तथापि अलिकडच्या तीन वर्षापासून एमसीईएआरने कृषी विद्यापीठ स्तरावरील परीक्षा घेणे बंंद केले असून,‘नीट’ ‘सीईटी’मधून उर्त्तीण होणाºया विद्यार्थ्यांना कृषी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातोे. त्यामुळे कृषी पदवीसाठी ही स्पर्धा वाढली आहे. राज्यात डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ(अकोेला),स्व.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी), महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी,अहमदनगर), डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ (दापोली,रत्नागीरी) हे चार कृषी विद्यापीठ आहेत. या चार कृषी विद्यापीठातंर्गत शासकीय व खासगी महाविद्यालये मिळून जवळपास १५ हजार कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या जागा आहेत. पंरतुु कृषी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला असून, गत दोन तीन वर्षापासून ६५ ते ७० हजार विद्यार्थी कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज करीत आहेत.तथापि प्रवेश देताना आता (मेरीट)गुुणवत्ते नुसारच प्रवेश देण्यात येत आहेत. यावर्षी बारावीच्या परीक्षा फेब्रुवारीमध्ये आटोपल्या पंरतुु कोरोनामुळे काही ऐच्छिक विषयांचे पेरप तपासणीसाठी शिक्षकांककडे पोहोचले नसल्याचे वृत्त आहे. तसेच संपूर्ण देशातच संचारबंंदी असल्याने सद्यातरी ‘नीट’ ‘सीईटी’ परीक्षा घेणे शकय नसल्याचे दिसते. त्यामुळे कृषी पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश लांबण्याची शकयता आहे. दरम्यान,र्माच महिन्याच्या दसुºया आठवडयात कृषी पदव्यूत्तर अभ्यासकमाची सीईटी घेण्यात आली होती त्या परीक्षेचा निकाल २८ मार्च रोजी लागला आहे.चारही कृषी विद्यापीठ मिळून हे साडेचार हजारावर विद्यार्थी आहेत.

 कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी आता कृषी विद्यापीठस्तरावर स्वतंत्र परीक्षा घेतली जात नाही.‘नीट’ आणि ‘सीईटी’ परीक्षेत उतर्तीर्ण होणाºया विद्यार्थंना कृषी पदवीसाठी प्रवेश दिला जातो.
- डॉ. पी.जी.इंगोले, संचालक (शिक्षण),
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

 

Web Title: Corona Efect: Admission process of Bachelor of Agriculture Degree will defferd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.