कोरोना वाटत फिरणारे गृह विलगीकरणातील बेजबाबदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:18 AM2021-03-25T04:18:37+5:302021-03-25T04:18:37+5:30

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - २५,४३६ ॲक्टिव्ह रुग्ण - ६,२९२ गृह विलगीकरणातील रुग्ण - २३४५८ ...

Corona feels irresponsible in wandering home separation! | कोरोना वाटत फिरणारे गृह विलगीकरणातील बेजबाबदार!

कोरोना वाटत फिरणारे गृह विलगीकरणातील बेजबाबदार!

Next

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - २५,४३६

ॲक्टिव्ह रुग्ण - ६,२९२

गृह विलगीकरणातील रुग्ण - २३४५८

रुग्णालयात दाखल -७९८

दक्षिण झोन

महापालिकेच्या दक्षिण झोनमध्ये साधारणत: ३० वर्षे वयोगटातील एक कोविड पॉझिटिव्ह रुग्ण मंगळवारी गृह विलगीकरणासाठी अर्ज करताना दिसून आला. गृह विलगीकरणाचा अर्ज भरल्यानंतर ही तो रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात गेला व डॉक्टरांना भेटला. डॉक्टरांच्या भेटीनंतर थेट मेडिकल स्टोअरमध्ये प्रवेश करताना दिसून आला. यानंतर संबंधित रुग्ण त्याच्या घरी पाेहोचल्याचे आढळून आले.

काही रुग्णांची मजबुरी

पॉझिटिव्ह येऊनही काही रुग्ण बाहेर फिरत होते, मात्र चौकशीनंतर संबंधित रुग्णाची मजबुरी समोर आली. दोन सदस्यांच्या एका कुटुंबातील एक सदस्य पॉझिटिव्ह असल्याने रुग्णालयात दाखल, तर दुसरा सदस्य गृह विलगीकरणात आहे. गृह विलगीकरणातील रुग्णाला रोजच्या जीवनावश्यक वस्तूंसाठी एक किंवा दोन दिवसांआड घराबाहेर पडावेच लागत असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. कोरोनाच्या धाकाने शेजारीही संपर्क ठेवत नाहीत. हीच मजबुरी जिल्ह्यातील अनेक रुग्णांची आहे.

या बेजबाबदारांना कोण आवरणार?

शहरात कोरोना वाटत फिरणाऱ्या गृह विलगीकरणातील बेजबाबदार रुग्णांवर महापालिकेच्या पथकाद्वारे कारवाई केली जात आहे. मात्र, तरीसुद्धा अनेक जण बेफिकिरीने वावरत आहेत; त्यामुळे अशा रुग्णांना कोण आवरणार, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे.

Web Title: Corona feels irresponsible in wandering home separation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.