शहरात कोरोनाचा कहर, ३०० पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:17 AM2021-04-19T04:17:11+5:302021-04-19T04:17:11+5:30
पूर्व झोनअंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी १०९ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आणि रॅपिड अँटिजन चाचणीसाठी एकूण १०५ स्वॅब घेण्यात आले. ...
पूर्व झोनअंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी १०९ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आणि रॅपिड अँटिजन चाचणीसाठी एकूण १०५ स्वॅब घेण्यात आले. त्यामध्ये सात नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह, तर ९८ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले. पश्चिम झोनअंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी २७ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आणि रॅपिड अँटिजन चाचणीसाठी एकूण ३६४ स्वॅब घेण्यात आले. त्यामधून ३ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून, ३६१ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उत्तर झोनअंतर्गत आरटीपीआर चाचणीसाठी ९७, तर रॅपिड अँटिजन चाचणीसाठी १९५ स्वॅब घेण्यात आले. त्यामध्ये १६ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून, १७९ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तसेच दक्षिण झोनअंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी ८८ नागरिकांचे, तर रॅपिड अँटिजन चाचणीसाठी ८८ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. त्यामध्ये ८८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. पूर्व झोनअंतर्गत ८३, पश्चिम झोनअंतर्गत ४३, उत्तर झोनअंतर्गत ५७ आणि दक्षिण झोनअंतर्गत ११८, असे एकूण ३०० नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.