राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाला कोरोनाचा फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:20 AM2021-01-03T04:20:01+5:302021-01-03T04:20:01+5:30
दरवर्षी दोन टप्प्यांत होते आरोग्यतपासणी राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत प्रत्येक शैक्षणिक सत्रात दोन टप्प्यांत विद्यार्थ्यांची आरोग्यतपासणी केली जाते. विद्यार्थ्यांमध्ये आढळणाऱ्या ...
दरवर्षी दोन टप्प्यांत होते आरोग्यतपासणी
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत प्रत्येक शैक्षणिक सत्रात दोन टप्प्यांत विद्यार्थ्यांची आरोग्यतपासणी केली जाते. विद्यार्थ्यांमध्ये आढळणाऱ्या विविध आजारांचे निदान केले जात असले, तरी हृदयविकार आणि डोळ्यांच्या तिरळेपणाच्या उपचारावर जास्त भर दिला जातो.
हर्निया, हायड्रोसीलच्या रुग्णांवरही होणार शस्त्रक्रिया
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदयविकारासह हर्निया, हायड्रोसील, डोळ्यांचा तिरळेपणा या आजारांवरही शस्त्रक्रिया केल्या जातात. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांच्या या मोहिमेमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात अशा रुग्णांचे निदान होण्यास मदत होत आहे. या रुग्णांवर टप्प्याटप्प्याने विशेष शिबिर घेऊन अकोल्यातच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. बालकांमध्ये आढळणाऱ्या अशा रुग्णांना शोधून त्यांच्यावर योग्य उपचार झाल्याने शेकडो कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
‘आरबीएसके’अंतर्गत दरवर्षी बालकांमध्ये मोठ्या प्रमाणात हृदयविकार असल्याचे निदर्शनास येत आहे. या बालकांमध्ये आजाराचे निदान करून त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. कोरोनामुळे गत वर्षी हा कार्यक्रम काही प्रमाणात प्रभावित झाला असला, तरी लॉॅकडाऊनच्या काळातही गंभीर रुग्णावर मुंबई येथे यशस्वी शस्त्रक्रिया केली.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला