बोरगाव मंजू येथे खाजगी डॉक्टरला कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 01:00 PM2020-06-20T13:00:23+5:302020-06-20T13:01:02+5:30
एका खाजगी डॉक्टरचा कोरोना चाचणी अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
बोरगाव मंजू : अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील एका खाजगी डॉक्टरचा कोरोना चाचणी अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासनाने दखल घेऊन संबंधित रुग्णांच्या परिसरात भेट देऊन पाहणी करून उपाययोजना राबविण्यात येत आहे.
येथील एका खाजगी डॉक्टरला अस्वथ वाटत असल्याने त्यांनी अकोला येथील शासकीय रुग्णालयात १५ जुन रोजी तपासणी करून स्वॅब दिला ,परत बोरगाव मंजू येथुन दोन दिवसानी आपल्या नातेवाईकांकडे औरंगाबाद येथे गेले. त्यांचा वैद्यकीय तपासणी कोरोना अहवाल दिनांक २० जुन रोजी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक ग्रामपंचायतीच्या वतीने निर्जंतुुकीकरण औषधी फवारणी करण्यासह, आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून सदर पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व इतर परिसरातील घरांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या १६ आशा वर्कर,आठ अंगणवाडी सेविका, आशा गट प्रर्वतक आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक आदी पथकाने सर्वेक्षणास प्रारंभ करण्यात आला आहे. तब्बल सात हजार लोकांचा सर्र्व्हे करण्यात येणार आहे. दरम्यान, पॉझिटिव्ह रुग्णांच्या परिसरात ठाणेदार हरिश गवळी, सरपंच चंदा खांडेकर, जिल्हा परिषद सदस्या निता संदीप गवई, आरोग्य अधिकारी यांनी भेट देऊन जनतेने सावधगिरीने बाळगुण शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.