अग्निशमन विभागात कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 10:18 AM2020-06-26T10:18:04+5:302020-06-26T10:18:14+5:30

दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी समोर आले.

Corona infiltration into the fire department | अग्निशमन विभागात कोरोनाचा शिरकाव

अग्निशमन विभागात कोरोनाचा शिरकाव

googlenewsNext

अकोला : संसर्गजन्य कोरोना विषाणूने महापालिकेच्या अग्निशमन विभागात शिरकाव केला असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील कोविड सेंटरमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या संबंधित दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी समोर आले. संबंधित कर्मचाºयांचा अहवाल पॉझिटिव्ह येताच एकाच पाळीत सेवा बजावणाºया इतर चार कर्मचाºयांच्या स्रावाचे नमुने घेण्यात आले आहेत.
विदर्भातून कोरोना वाढीचा सर्वाधिक वेग अकोला जिल्ह्यासह शहरामध्ये दिसून येत आहे. महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या जात आहेत. यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा दिवस-रात्र कामाला लागल्याचे चित्र आहे. याव्यतिरिक्त किराणा, भाजीपाला तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी घराबाहेर निघणाºया नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. त्याचाही परिणाम कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवर झाल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोना विषाणूने आता मनपाच्या अग्निशमन विभागात शिरकाव केल्याचे समोर आले आहे. या विभागातील दोन कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालाअंती समोर आल्यामुळे इतर कर्मचाºयांमध्ये धास्ती पसरल्याची चर्चा आहे.


कोविड सेंटर येथे संपर्क
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात उभारण्यात आलेल्या कोविड सेंटर येथे अग्निशमन विभागाच्या वाहनाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. छतावरील टाकीत पाणी भरताना दोन्ही कर्मचारी या सेंटरमधील काही कोरोना संदिग्ध रुग्णांच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. असे असले तरीही मनपाकडून संबंधित कर्मचाºयांच्या संपर्कात आणखी कोण होते, याचा शोध घेतला जात आहे.


संपूर्ण विभागाचे निर्जंतुकीकरण
अग्निशमन विभागातील दोन कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने या संपूर्ण विभागाचे निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या शुक्रवारी पूर्व झोन कार्यालयाच्यावतीने फवारणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

Web Title: Corona infiltration into the fire department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.