१७ दिवसांत कोरोनाने घेतला १०२ लोकांचा बळी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:18 AM2021-04-18T04:18:27+5:302021-04-18T04:18:27+5:30
गंभीर रुग्णांमध्ये ग्रामीणचे प्रमाण ८० टक्के अकोला शहरात गंभीर अवस्थेत दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील रुग्ण हे सुमारे ८० ...
गंभीर रुग्णांमध्ये ग्रामीणचे प्रमाण ८० टक्के
अकोला शहरात गंभीर अवस्थेत दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील रुग्ण हे सुमारे ८० टक्के असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात येते. त्यामुळे तपासणीकडे दुर्लक्ष, विलंबाने उपचारास होणारी सुरुवात ही दोन कारणे वाढत्या मृत्यूचे कारण ठरत असल्याचे डाॅक्टर्स सांगतात.
अर्ली डिटेक्शनचे आव्हानच
जिल्ह्यात नुकत्याच येऊन गेल्या केंद्राच्या पथकाने मृत्यू रोखण्यासाठी अर्ली डिटेक्शन करून त्वरित उपचार सुरू करा अशा सूचना जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला दिल्या होत्या. मात्र जेथे रुग्णांचे रिपोर्ट पाच ते सहा दिवसांनी प्राप्त होतात. तेथे अर्ली डिटेक्शनचे काम यंत्रणा कितपत प्रभावीपणे करेल हा प्रश्न आहे.
असे वाढले रुग्ण (२०-२१)
महिना - रुग्ण - मृत्यू
एप्रिल - ०३
मे - २९
जून - ४७
जुलै - ३४
ऑगस्ट - ४७
सप्टेंबर - ८४
ऑक्टोबर - ४५
नोव्हेंबर - १२
डिसेंबर - २९
जानेवारी - १४
फेब्रुवारी - ३१
मार्च - ८६
एप्रिल - १०२ (१७ एप्रिलपर्यंत)