एप्रिलच्या पहिल्या ९ दिवसांतच कोरोनाचे ३९ बळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:18 AM2021-04-10T04:18:06+5:302021-04-10T04:18:06+5:30
दुपटीने वाढला मृत्यूचा आकडा मार्च महिन्यात ९ तारखेपर्यंत कोरोनाचे २० बळी गेले होते, मात्र एप्रिल महिन्यातील स्थिती त्यापेक्षाही भयावह ...
दुपटीने वाढला मृत्यूचा आकडा
मार्च महिन्यात ९ तारखेपर्यंत कोरोनाचे २० बळी गेले होते, मात्र एप्रिल महिन्यातील स्थिती त्यापेक्षाही भयावह असल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसून येत आहे. एप्रिल महिन्याला सुरुवात होताच मृत्यूचे सत्र सुरूच असून, गत नऊ दिवसांत जिल्ह्यात ३९ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला.
समूह संसर्गात सुपर स्प्रेडर धोक्याचे
जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग असून, सार्वजनिक ठिकाणी वावरणारे लक्षणेविरहित सुपर स्प्रेडर कोरोनाचा संसर्ग वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे संसर्गाचा वेग पुन्हा वाढण्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
असे आढळले रुग्ण
मार्चचा पहिला आठवडा - ३,०८८
एप्रिलचा पहिला आठवडा - २,१००
रुग्णांमध्ये घट - ३२ टक्के
नऊ दिवसांतील मृत्यूचा आलेख
दिनांक - मृत्यू
१ - ०५
२ - ०४
३ - ०६
४ - ०२
५ - ०४
६ - ०४
७ - ०८
८ - ०३
९ - ०३