अकोला जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू, २५ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 01:13 PM2020-12-05T13:13:24+5:302020-12-05T13:13:36+5:30
Akola Corona News आणखी दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची एकूण संख्या ३९६ वर गेली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकुळ थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, शनिवार, ५ डिसेंबर रोजी आणखी दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची एकूण संख्या ३९६ वर गेली आहे. दरम्यान, आणखी २५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ९६२६ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी २९१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत, तर उर्वरित २६६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कौलखेड येथील चार, राम नगर व गजानन नगर डाबकी रोड येथील प्रत्येकी दोन, तर लक्ष्मी नगर, पातूर, डाबकी रोड, काँग्रेस नगर, आदर्श कॉलनी, तोष्णीवाल लेआऊट, सिंधी नगर, पारस, बपोरी ता. मूर्तिजापूर, उमरा ता. पातूर, साष्टी ता. पातूर, तुलंगा ता. पातूर, बार्शीटाकली, बाजोरिया नगर, छोटी उमरी, कैलास टेकडी निमवाडी व कवर नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
महिला व पुरुषाचा मृत्यू
शनिवारी दोघांचा मृत्यू झाला. पंचशील नगर येथील ७२ वर्षीय पुरुष व अकोट तालुक्यातील धारेल येथील ६५ वर्षीय महिला या दोघांचा मृत्यू झाला. दोघांना अनुक्रमे २७ व २८ नोव्हेंबर रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
६४९अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९,६२६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८,६७९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २९८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६४९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.