ग्रामीण भागात कोरोनामुक्तीचे वारे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:26 AM2021-06-16T04:26:00+5:302021-06-16T04:26:00+5:30
अकोला : जिल्ह्यात सध्या नवीन कोविडबाधित सापडण्याची गती मंदावली आहे. इतकेच नव्हे तर मागील ८ दिवसांपासून पातूर, बार्शीटाकळी तालुक्यात ...
अकोला : जिल्ह्यात सध्या नवीन कोविडबाधित सापडण्याची गती मंदावली आहे. इतकेच नव्हे तर मागील ८ दिवसांपासून पातूर, बार्शीटाकळी तालुक्यात बोटावर मोजण्याइतकेच नवीन कोविड बाधित सापडल्याने हे तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर असल्याचे दिसून येते. असाच प्रकार इतर तालुक्यातही असल्याने ग्रामीण भागात कोरोनामुक्तीचे वारे वाहत आहेत.
कठोर निर्बंधांनंतर मिळालेली सूट व या कालावधीत लोकांनी जागरुकतेने कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी केली असल्याने ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण घटले आहे. ही स्थिती कायम राहिल्यास ग्रामीण भाग कोरोनामुक्त होऊ शकतो.
- डॉ. सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी.
निर्बंध ठरले फायद्याचे
कोविडचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू केले होते. याच कठोर निर्बंधाला प्रतिसाद मिळाल्याने नवीन रुग्णवाढ बऱ्यापैकी घटली आहे.