काेराेना अद्याप गेला नाही, या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 10:35 AM2021-06-02T10:35:01+5:302021-06-02T10:35:12+5:30

Corona Virus : अनलाॅकमध्ये केलेल्या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ ठरणार आहे.

Corona is not gone yet, if these five mistakes are repeated, the third wave is inevitable! | काेराेना अद्याप गेला नाही, या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ!

काेराेना अद्याप गेला नाही, या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ!

googlenewsNext

अकाेला : काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी गेल्या महिनाभरापासून लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे अकाेल्यात कोविड रुग्णांची संख्या कमी हाेत असली तरी गंभीर रुग्णांची संख्या कायम आहे. त्यामुळे काेराेनाचा धाेका अद्याप टळलेला नाही. आता अनलाॅकची प्रक्रिया सुरू करून सकाळी सात ते दुपारी २ वाजेपर्यंत व्यावसायिक प्रतिष्ठाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनलाॅकमध्ये केलेल्या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ ठरणार आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा जास्त धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत मुलांना घराबाहेर सोडू नका, असा सल्लाही तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जात आहे. कोराेनाच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेत कोरोनाचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मागील वर्षभरात एक हजारापेक्षा जास्त चिमुकल्यांना कोरोनाची लागण झाली असून, यातील बहुतांश बालरुग्ण मागील सहा महिन्यांतील असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे येणारा काळ हा लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकतो. कोरोनाचा धोका कायम असल्याने पालकांनी घरातील बालकांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

 

निर्बंध शिथिल केल्यानंतर बेफिकीर झालेल्या नागरिकांनी वाहतूककाेंडी हाेईपर्यंत बाजारात प्रचंड गर्दी केली. या गर्दीतून अनेकांनी काेराेना घरी नेला असण्याची शक्यता आहे.

 

काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी मास्क आवश्यक असल्याचे आराेग्य विभागाचे म्हणणे आहे. आता तर डबल मास्क वापरण्याच्या सूचना आहेत; मात्र अनेक अकाेलेकर मास्कचा वापर हनुवटीवरच करताना दिसतात.

 

मंगल कार्यालये बंद आहेत. मात्र घरगुती स्वरूपात हाेणाऱ्या लग्न साेहळ्यांची गर्दी तसेच गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांनी बाहेर फिरून वाटलेला काेराेनाचा ‘प्रसाद’.

 

जानेवारी महिन्यात ग्रामपंचायत निवडणूक झाली. या निवडणुकीच्या प्रचारासाठी झालेले राजकीय कार्यक्रम, बैठकांमधील गर्दीमुळेही काेराेनाचा आलेख उंचावल्याचे दिसून आले.

 

पहिल्या लाटेत नागरिकांनी वैयक्तिक व कुटुंबाची काळजी घेतली, लक्षणे दिसताच चाचण्या केल्या. दुसऱ्या लाटेत मात्र वैयक्तिक काळजीचा भर ओसरलेेला दिसून आला. त्यामुळेच लक्षणे असूनही घरीच उपचार केल्याने रुग्ण गंभीर झाल्यावर रुग्णालयात दाखल केल्यानेच मृत्युदर वाढलेला दिसला.

 

पालिकेचे केवळ एकच पथक

निर्बंध शिथिल झाल्यानंतर काेराेनाच्या प्रतिबंधक नियमांचे पालन हाेते का, याकडे लक्ष देण्यासाठी महापालिकेने केवळ एका पथकाची नियुक्ती केली आहे.

मनपाने गठीत केलेल्या या पथकात केवळ आठ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

यापूर्वी महापालिकेने पाच पथकांचे गठण केले हाेते. या पथकांनी झाेननिहाय दक्षता घेत काेराेना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली हाेती.

आता निर्बंध शिथिल केल्याने घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर नियमांचे पालन करण्याची सक्ती करण्यासाठी अधिक पथकाची गरज हाेती.

Web Title: Corona is not gone yet, if these five mistakes are repeated, the third wave is inevitable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.