कोरोना: एकाचा मृत्यू, ३३ पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:53 AM2020-12-04T04:53:50+5:302020-12-04T04:53:50+5:30
४९ रुग्णांना डिस्चार्ज रुग्णसंख्या वाढ होत असताना गुरुवारी ४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये ...
Next
४९ रुग्णांना डिस्चार्ज
रुग्णसंख्या वाढ होत असताना गुरुवारी ४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून एक जण, अकोला ॲक्सिडेंट क्लिनिक येथून एक, आयकॉन हॉस्पिटल येथून सात, ओझोन हॉस्पिटल येथून आठ, हॉटेल रिजेन्सी येथून पाच, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून तीन, बिऱ्हाडे हॉस्पिटल येथून चार तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले २० जण, अशा एकूण ४९ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.