कोरोना होऊन गेला; इतर आजारावरील शस्त्रक्रिया करायची कधी? संभ्रम कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:18 AM2021-09-13T04:18:52+5:302021-09-13T04:18:52+5:30
कोरोनाचे एकूण रुग्ण -५७,८४० बरे झालेले रुग्ण - ५६,६८२ एकूण कोरोना बळी - १,१३६ सध्या उपचार सुरू असलेले ...
कोरोनाचे एकूण रुग्ण -५७,८४०
बरे झालेले रुग्ण - ५६,६८२
एकूण कोरोना बळी - १,१३६
सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण - २२
शस्त्रक्रियेसाठी दोन महिने वाट पाहा
कोरोनातून बरे झाल्यानंतर बहुतांश रुग्णांना थकवा जाणवतो. भूकही मंदावते. अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया करणे योग्य राहत नाहीत. त्यामुळे कुठल्याही शस्त्रक्रियेचा विचार करीत असाल, तर सुमारे दीड ते दोन महिने थांबलेलेच बरे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देतात.
इमर्जन्सी शस्त्रक्रिया
कोविडमधून बरे झालेल्या रुग्णाला आपत्कालीन परिस्थितीत शस्त्रक्रिया करणे धोक्याचे ठरू शकते.
अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्यानेच शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यावा.
प्लान शस्त्रक्रिया
प्रत्येक रुग्णाची शारीरिक व मानसिक स्थिती वेगळी असते. त्यानुसार रुग्णाने प्लान शस्त्रक्रिया करावी.
मात्र, कोविडमुळे रुग्णाचे आरोग्य बिघडल्यास प्लान शस्त्रक्रिया तज्ज्ञांच्या मते पुढी ढकलावे.
प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोविड होऊन गेलेल्या रुग्णांवर महिना दीड महिन्यानंतरच शस्त्रक्रिया करावी. याच काळात रुग्णाला, सर्दी, ताप किंवा खाेकला असेल, तर त्यांच्या सर्वच आवश्यक चाचण्या करून आपत्कालीन शस्त्रक्रिया केल्या जातात.
- डॉ. वंदना वसो, (पटोकार) जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला