बाळापूर शहरात कोरोना रुग्णांची शतकाकडे वाटचाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:19 AM2021-04-07T04:19:41+5:302021-04-07T04:19:41+5:30
उपविभागीय महसूल अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी व न.प. मुख्याधिकारी जी. एस. पवार यांनी खासगी ...
उपविभागीय महसूल अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी व न.प. मुख्याधिकारी जी. एस. पवार यांनी खासगी डॉक्टरांसह आजी-माजी नगरसेवक, समाजसेवक यांची बैठक घेऊन कोरोना लस घेण्यासाठी समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले. तसेच तालुका प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यानी कोरोना लस घ्यावी. तपासणी रिपोर्टशिवाय कुठल्याही कार्यालयात प्रवेश बंदीचा आदेश जाहीर केला. कार्यालय परिसरातच कोरोना स्वॅब व आरटीपीसीआर तपासणी करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या ब्रेक दी चेन नुसार तालुक्यात आवश्यक दुकाने उघडे राहतील. इतर सर्व दुकाने शासन आदेशानुसार बंद राहणार आहेत. खासगी डॉक्टराना वयाचे बंधन न ठेवता, लस देण्यासाठी वरिष्ठांशी बोलून लवकरच लस देण्याचे उद्दिष्ट देण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी केले आहे. शहरात कोरोना बाधित संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.