कोरोनाकाळात ग्राहकांची ऑनलाईन वीजबिल भरण्याला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:19 AM2021-04-01T04:19:43+5:302021-04-01T04:19:43+5:30
महावितरणची वेबसाईट व मोबाईल एप तसेच अन्य पर्यायांद्वारे 'ऑनलाईन' वीजबिल भरणा क्रेडीट कार्ड वगळता निःशुल्क करण्यात आला आहे. कोरोना ...
महावितरणची वेबसाईट व मोबाईल एप तसेच अन्य पर्यायांद्वारे 'ऑनलाईन' वीजबिल भरणा क्रेडीट कार्ड वगळता निःशुल्क करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात वीजबील भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहणे किंवा गर्दी टाळून घरबसल्या कोणत्याही वेळेत 'ऑनलाईन' वीजबिल भरण्याची सोय वीजग्राहकांना उपलब्ध आहे.
महावितरणने लघुदाब वीजग्राहकांसाठी 'ऑनलाईन' बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच जून २०१६ पासून मोबाईल अॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा 'ऑनलाईन' भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. वीजग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे वीजबिल भरणा केंद्रात जाऊन रांगेत उभे राहण्याऐवजी 'ऑनलाईन' वीजबिल भरण्यास वीजग्राहकांची पसंती वाढलेली आहे.
सद्यस्थितीत अकोला परिमंडलातील १.८४ लाख ग्राहक दरमहा सरासरी ३२.०३ कोटी रूपयाचा ऑनलाईनव्दारे वीज बिल भरणा करतात. महावितरणच्या प्रादेशीक विभागानुसार नागपूर प्रादेशिक विभागात १० लाख ८८ हजार ग्राहक १८९ कोटी ६४ लाख रुपयांचा , कोकण प्रादेशिक विभागात ३० लाख ५४ हजार वीजग्राहक दरमहा सरासरी ६९५ कोटी रुपयांचा तर पुणे प्रादेशिक विभाग – १८ लाख ७१ हजार ग्राहक ४२५ कोटी ८० लाख रुपयांचा आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागात ५ लाख ९४ हजार वीजग्राहक १०५ कोटी ४२ लाख रुपयांचा 'ऑनलाईन'द्वारे वीजबिलांचा भरणा करीत आहेत.
'ऑनलाईन' बिल भरण्यावर ०.२५ टक्के सूट
लघुदाब वीजग्राहकांसाठी 'ऑनलाईन' बिल भरण्यासाठी दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. याआधी नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा 'ऑनलाईन' भरणा करण्यासाठी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीटकार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीटकार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून 'ऑनलाईन'द्वारे होणारा वीजबिल भरणा आता निःशुल्क आहे.