कोरोना काळातील पत्रकारांचे कार्य दिशादर्शक : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:57 AM2021-01-08T04:57:34+5:302021-01-08T04:57:34+5:30

अकोला : कोरोनाचा सुरुवातीचा कालखंड प्रचंड दहशतीचा होता. नेमके कार्य कोणते व कसे करावे हे प्रशासनाला व समाजालादेखील ...

Corona period work guide for journalists: Collector | कोरोना काळातील पत्रकारांचे कार्य दिशादर्शक : जिल्हाधिकारी

कोरोना काळातील पत्रकारांचे कार्य दिशादर्शक : जिल्हाधिकारी

Next

अकोला : कोरोनाचा सुरुवातीचा कालखंड प्रचंड दहशतीचा होता. नेमके कार्य कोणते व कसे करावे हे प्रशासनाला व समाजालादेखील अवगत नव्हते. त्या कालखंडात पत्रकारांनी कोरोना दहशतीच्या कालखंडातही जिवावर उदार होऊन वार्तांकन केले, हे पत्रकारांचे कार्य अभिमानास्पद होते. आपल्या बातम्यांच्या माध्यमातून प्रशासनाला केलेले सहकार्य दिशादर्शक ठरले, असे प्रतिपादन अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंंद्र पापळकर यांनी केले. ते स्थानिक पत्रकार भवनातील स्व. पन्नालाल शर्मा सांस्कृतिक सभागृहात आयोजित पत्रकार दिन सोहळ्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजूरकर व्यासपीठावर विराजमान होते. शौकतअली मिरसाहेब यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान, याच कार्यक्रमात प्रमुख वक्त्त्यांच्या व्याख्यानानंतर कोरोना योद्धा पत्रकार प्रवीण खेते, माणिक कांबळे, साकिब अकुद्रुस, अनिल दंदी, रवींद्र इंगळे, किरण निमकंडे, जयप्रकाश रावत, अनंत अहेरकर, राजेंद्र श्रीवास, नीलेश धाडीकर या पत्रकारांचा, तसेच कोरोना योद्धा स्वयंसेवक म्हणून प्रा. किशोर बुटोले, गिरीश जोशी, जावेद जकेरिया, प्रकाश घोगलिया, अलका देशमुख, डॉ. जुबेर नदीम, प्रकाश लोडीया, पराग गवई, निशिकांत बडगे, रामदास सरोदे यांचा त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या पहिल्या सत्राच्या कार्यक्रमाचे संचलन प्रमोद लाजूरकर यांनी, तर दुसऱ्या सत्रातील सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन संजय खांडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे उमेश अलोने यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला राजू उखळ्कर, गजानन सोमाणी, रामदास वानखडे, विजय शिंदे, किर्तीकुमार वर्मा, प्रा. अविनाश बेलाडकर, अविनाश राऊत, कमलकिशोर शर्मा, उमेश जामोदे, सुरेश नागापुरे, दिलीप गिहे, बी. एस. इंगळे, विलास खंडारे, समाधान खरात, मधू कसबे, मनीष खडसे, प्रा. मधू जाधव, प्रा. मोहन खडसे, दीपक देशपांडे, मुुकुंद देशमुख, सुधाकर देशमुख, विजय सारभुुकन, उमेश देशमुख, प्रदीप काळपांडे, संगीता इंगळे, वंदना शिंगणे, नीलिमा शिंगणे, प्रल्हाद ढोकणे, सुरेश सिंगनारे, सदानंद खारोडे, शैलेश अलोने, प्रा. प्रवीण ढोणे, मोहन जोशी, शिवदास जामोदे, उत्तम दाभाडे, संजय अलाट, शरद गांधी, लक्ष्मण हागे, जय जग्गड, मधू कसबे, मनीष खर्चे, निसार शेख, प्रमोद कढोणे, आदी उपस्थित होते.

Web Title: Corona period work guide for journalists: Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.