कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण चार तास ‘एक्स-रे’साठी वेटिंगवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 10:16 AM2020-06-13T10:16:40+5:302020-06-13T10:16:54+5:30

१ वाजताच्या सुमारास हे रुग्ण तेथे पोहोचल्यावर वॉर्डात तंत्रज्ञनच उपस्थित नसल्याचे समजले.

Corona positive patient waiting for X-ray for four hours! | कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण चार तास ‘एक्स-रे’साठी वेटिंगवर!

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण चार तास ‘एक्स-रे’साठी वेटिंगवर!

googlenewsNext

अकोला : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वोपचार रुग्णालयावरील ताण वाढला आहे. प्रयत्न करूनही व्यवस्थापन बिघडत आहे. याचाच फायदा काही कर्मचाऱ्यांकडून घेण्यात येत असल्याचं वास्तव शुक्रवारी ‘एक्स-रे’ काढण्यासाठी गेलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकरणातून उघडकीस आलं.
सर्वोपचारमध्ये मनुष्यबळाची कमी ही मोठी डोकेदुखी ठरत आहे; मात्र, याचाच फायदा काही कर्मचारी घेत असल्याचे वास्तव आहे. असाच काहीसा प्रकार शुक्रवारी ‘एक्स-रे’ काढण्यासाठी गेलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या निदर्शनास आला. वैद्यकीय चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सात ते आठ पॉझिटिव्ह रुग्णांना ‘एक्स-रे’ काढण्यासाठी पाठविण्यात आले. दुपारी १ वाजताच्या सुमारास हे रुग्ण तेथे पोहोचल्यावर वॉर्डात तंत्रज्ञनच उपस्थित नसल्याचे समजले. तास दोन तासांचा वेळ गेल्यानंतर तेथील एका कर्मचाºयाने पॉझिटिव्ह रुग्णांनाच ‘एक्स-रे’ प्लेट आणून द्या अन् ‘एक्स-रे’ घेऊन जाण्याचा सल्ला दिला. हा प्रकार प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर संबंधित कर्मचाºयांनी तत्काळ त्या रुग्णांना ‘एक्स-रे’ दिला. या संदर्भात संबधीत अधिकाºयांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.


...तर चार तास प्रतीक्षा का?
कोरोनाबाधित रुग्णांनी एक्स-रे साठी तब्बल चार तास प्रतीक्षा केल्यानंतर त्यांना एक्स-रे देण्यात आला. रुग्णालयात एक्स-रे प्लेट उपलब्ध असल्यामुळेच रुग्णांना एक्स-रे मिळाले. मग संबंधित अधिकारी, कर्मचाºयांनी त्या रुग्णांना चार तास तात्कळत ठेवण्याचे कारण काय? हा संशोधनाचा विषय आहे.


एक दिवसापूर्वीच जीएमसीला मिळाल्या एक्स-रे प्लेट
कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता व्हेंटीलेटरसोबतच एक्स-रे प्लेटचीदेखील मागणी करण्यात आली होती. मागणीनुसार, गुरुवारीच सर्वोपचार रुग्णालयाला एक्स-रे प्लेट उपलब्ध झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.


तंत्रज्ञांची अनुपस्थिती नेहमीचीच
सर्वोपचार रुग्णालयातील एक्स-रे आणि सोनोग्राफी तंत्रज्ञांची अनुपस्थिती रुग्णांसाठी नेहमीचीच डोकेदुखी आहे. एरवी खासगी लॅबही सांभाळून सर्वोपचार रुग्णालयात सेवा देणाºया या तंत्रज्ञांची महामारीच्या काळातही अनुपस्थिती गंभीर बाब आहे.

माझ्यासह पत्नी व दोन मुलांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांनी एक्स-रे काढण्यास सांगितले. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयातील एक्स-रे वार्डात आलो होतो; परंतु या ठिकाणी तंत्रज्ञ उपस्थित नव्हते. तर उपस्थित कर्मचाºयांकडून एक्स-रे प्लेटची मागणी करण्यात आली होती. चार तासांच्या प्रतीक्षेनंतर एक्स-रे मिळाले.
- पॉझिटिव्ह रुग्ण, जीएमसी, अकोला.

 

Web Title: Corona positive patient waiting for X-ray for four hours!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.