कोरोना पसरू नये, म्हणून एसटी बसचे होणार अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 10:42 AM2021-08-12T10:42:47+5:302021-08-12T10:43:09+5:30

ST bus will have a coating: पाच आगारांतील मिळून १२७ बसगाड्यांचे या अंतर्गत कोटिंग केले जाणार आहे.

The corona should not spread, so the ST bus will have a coating! | कोरोना पसरू नये, म्हणून एसटी बसचे होणार अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग

कोरोना पसरू नये, म्हणून एसटी बसचे होणार अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग

Next

- सागर कुटे

अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ आपल्या दहा हजार गाड्यांना अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करणार आहे. त्यामुळे प्रवाशांना विषाणूंपासून सुरक्षाकवच मिळणार आहे. हे अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग एसटीच्या सर्व श्रेणीतील बसेसमध्ये केले जाणार आहे. जिल्ह्यातील पाच आगारांतील मिळून १२७ बसगाड्यांचे या अंतर्गत कोटिंग केले जाणार आहे.

अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग प्रक्रिया बसेसमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात करणारी एसटी पहिली वाहतूक संस्था आहे. कोरोनामुळे राज्यभरातील एसटी महामंडळाचे चाक थांबले होते. आता एसटी सुरू असली, तरी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा होत आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने बसला अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी बसमध्ये अनेक ठिकाणी प्रवासी स्पर्श करतात, ज्यामुळे कोरोना व इतर विषाणूंच्या प्रसाराचा धोका असतो. तो टाळण्यासाठी एसटीने बसेसला अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील १२७ बसगाड्यांना या अंतर्गत मायक्रोबियल कोटिंग केले जाणार आहे. कोरोना काळात या घेण्यात आलेला निर्णय महत्त्वपूर्ण आहे.

जिल्ह्यातील आगार आणि बसेस

आगार - बसेस

आगार क्र. १ - २६

आगार क्र. २ - ३०

अकोट - ३५

तेल्हारा - १९

मूर्तिजापूर - १७

महिनाभरात एसटी होणार कोरोनामुक्त

एसटी बसगाड्यांना मायक्रोबियल कोटिंग करण्याची प्रक्रिया विभागीय स्तरावरील कार्यशाळेत पार पाडली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पाच आगारांत असलेल्या बसगाड्यांच्या संख्येची माहिती आणि प्राधान्यक्रमाबाबत कल्पना देण्यात आली असून, येत्या महिनाभरात जिल्ह्यातील सर्वच आगारातील बसगाड्यांचे कोटिंग होऊन, त्या कोरोनामुक्त केल्या जाणार आहेत.

 

आतापर्यंत एसटीचा सॅनिटायझरवर लाखोंचा खर्च

जिल्ह्यात कोरोना संसर्ग पसरू लागल्यानंतर, काही काळाने एसटीची प्रवासीसेवा बंद ठेवण्यात आली, तर ती सुरू करण्यात आल्यानंतर सॅनिटायझेशन करूनच बसगाड्या सोडण्याचे निर्देश होते. त्या निर्देशाची काटेकोर अंमलबजावणी आगारांनी केली. त्यात गत सव्वावर्षाच्या काळात पाचही आगारांना मिळून एसटीच्या सॅनिटायझरवर लाखोंचा खर्च झाल्याचे माहितीवरून समजते.

विषाणू नष्ट करण्याची क्षमता

एसटीला अँटिमायक्रोबियल कोटिंग करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांनी बसच्या गेटचे हँडल, सीटच्या पुढील हँडल आणि इतर भागाला हात लावला आणि त्यांच्या हातावर विषाणू असला, तरी कुठलाही विषाणू नष्ट करण्याची क्षमता या कोटिंगमध्ये राहणार आहे. यासाठी एजन्सी नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती आहे.

Web Title: The corona should not spread, so the ST bus will have a coating!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.