अकोला जिल्ह्यात कोरोना मंदावला; गुरुवारी केवळ एक पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 07:47 PM2021-07-29T19:47:01+5:302021-07-29T19:47:12+5:30
Corona slowed down in Akola district : ४५८ रॅपिड ॲन्टिजन चाचण्यांमध्ये तेल्हारा येथे एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला.
अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग आता लक्षणीय मंदावला असून, गुरुवार, २९ जुलै रोजी आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये केवळ एक पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली. जिल्ह्यातील आतापर्यंत बाधितांची संख्या ५७,७५९ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे एकूण ३१० तपासणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. बुधवारी दिवसभरात झालेल्या ४५८ रॅपिड ॲन्टिजन चाचण्यांमध्ये तेल्हारा येथे एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला.
५४ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात केवळ ५४ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आतापर्यत ५६,५७१ जणांनी कोरोनावर मात केली असून, ११३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.