कोरोनाचा वेग मंदावला; आणखी १७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 12:07 PM2020-10-21T12:07:46+5:302020-10-21T12:08:09+5:30
Aklola News, CoronaVrius १७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,१४२ झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून, बुधवार, २१ आॅक्टोबर रोजी १७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,१४२ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे १५० अहवाल प्राप्त झाले. यापैकी १७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १३३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये आश्रय नगर येथील तीन, सिंधी कॅम्प व अकोट येथील प्रत्येकी दोन, बाभुळगाव जहाँगीर, उमरी, मलकापूर, पिंपळखुटा, डाबकी रोड, न्यु महसूल कॉलनी, बाळापूर, गोरे अर्पाटमेन्ट, खडकी खदान व शिवर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
४७९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,१४२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,३९७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २६६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४७९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.