साडेचारशे घरांसमोर कोरोना विषाणूमुक्तीसाठी फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:17 AM2021-04-13T04:17:17+5:302021-04-13T04:17:17+5:30
सार्वजनिक स्थाने विशेषतः रस्ते, बाजारपेठा, खरेदीची दुकाने, सामाजिक केंद्रे, उद्याने, क्रीडांगणे, मैदाने, तसेच रहिवासी परिसरातल्या मोकळ्या जागा ही सर्व ...
सार्वजनिक स्थाने विशेषतः रस्ते, बाजारपेठा, खरेदीची दुकाने, सामाजिक केंद्रे, उद्याने, क्रीडांगणे, मैदाने, तसेच रहिवासी परिसरातल्या मोकळ्या जागा ही सर्व ठिकाणे सामाजिक जीवनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत. कोरोना विषाणूजन्य आजार असून, श्वसनरोग आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या पृष्ठभागावर कोरोनाचे विषाणू बराच काळ टिकून राहतात. शहरांमध्ये विशेषतः सार्वजनिक ठिकाणी ज्या स्थानी विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता जास्त आहे, अशा क्षेत्रामध्ये स्वच्छता करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. रस्त्यांच्या निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात आली. सोडियम हायपोक्लोराइट वापरून सार्वजनिक स्थळांचे निर्जंतुकीकरणासाठी प्रयत्न केला जात आहे. प्रभाग तीनमधील ज्योतीनगर, प्रसाद कॉलनी, केला प्लॉट, अमृत सोसायटी, बिर्ला एबीसी कॉलनी, गड्डम प्लॉट, शंकरनगर, गुप्ते रोड, दिवेकर आखाडा, बौद्ध विहार या भागात फवारणी करण्यात आली.
फोटो: