अकोल्यात झाल्या १८ हजारांवर कोरोना चाचण्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 10:46 AM2020-07-20T10:46:41+5:302020-07-20T10:46:50+5:30

जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असला, तरी एकूण १८,५४१ चाचण्यांपैकी ८८.५३ टक्के संदिग्ध रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

Corona tests on 18,000 in Akola! | अकोल्यात झाल्या १८ हजारांवर कोरोना चाचण्या!

अकोल्यात झाल्या १८ हजारांवर कोरोना चाचण्या!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असला, तरी एकूण १८,५४१ चाचण्यांपैकी ८८.५३ टक्के संदिग्ध रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण चाचण्यांच्या तुलनेत ११.६४ टक्क्यांवर आहे. मृत्युदर मात्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असून, ४.९८ वर पोहोचला आहे. त्यामुळे एकदम घाबरून न जाता, थोडीशी खबरदारी घेतल्यास जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यास नक्कीच यश येईल.
अकोल्यात मे आणि जून या दोन महिन्यात कोरोनाचा झपाट्याने फैलाव झाला. जुलै महिन्यात हा वेग आणखी वाढत गेला; मात्र महापालिका क्षेत्रात गत काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचा वेग मंदावला. आता ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढत असून, चाचण्यांचा वेगही वाढविण्यात आला आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांच्या चाचणीला सुरुवात झाली. सुरुवातीला नागपूर येथील लॅबमधून, तर नंतर १२ एप्रिलपासून अकोल्यातच व्हीआरडीएल लॅबमधून चाचण्या घेण्यात आल्यात.
जिल्ह्यात व्हीआरडीएल लॅबमध्ये आतापर्यंत १६,५४९ संदिग्ध रुग्णांची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी २,००५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. म्हणजेच १२.११ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर ४.९८ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. गत आठवड्यापासून चाचण्यांचा वेग वाढविण्यासाठी रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट सुरू करण्यात आल्या. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजारांपेक्षा जास्त चाचण्या घेण्यात आल्या असून, त्यापैकी १२० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत.

रुग्ण बरे होण्याचा दर ७९.१५ टक्के
कोरोना रुग्णांची संख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्या तुलनेत कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १,६८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, ही संख्या एकूण रुग्णांच्या ७९.१५ टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनातून बरे होणाºया रुग्णांचा दरही चांगला आहे.

Web Title: Corona tests on 18,000 in Akola!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.