कोरोना चाचणीची विचारणा करणाऱ्या पथकाला धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:20 AM2021-03-23T04:20:35+5:302021-03-23T04:20:35+5:30
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकाेट परिसरात कालावधी संपल्यानंतर बाजारपेठ बंद करणे, तसेच दुकानदारांनी कोरोना चाचणी केली किंवा नाही, ...
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकाेट परिसरात कालावधी संपल्यानंतर बाजारपेठ बंद करणे, तसेच दुकानदारांनी कोरोना चाचणी केली किंवा नाही, याबाबत विचारणा करण्यासाठी पथक नेमण्यात आले. या पथकाने नरसिंग शाळा परिसरात बाजारपेठ बंद करीत तेथील दुकानदारांना कोरोना चाचणीबाबत विचारणा करीत होते. याच परिसरात हातगाडीवर दुकान सुरू असताना दुकानदार नरेंद्र बळीराम रोकडे याला कोरोना चाचणीबाबत विचारणा केली. या वेळी दुकानदाराने शिवीगाळ करीत पथकास धक्काबुक्की केली व झारा घेऊन मारण्यास धावला. तसेच पुन्हा आल्यास मारल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी व शिवीगाळ केल्याची तक्रार पथकाच्या वतीने आरोग्य निरीक्षक चंदन चंडालिया यांनी पोलिसात दिली. या तक्रारीवरुन आरोपी नरेंद्र बळीराम रोकडे (रा. रामदेव बाबा नगर, अकोट) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३५३ सह विविध गुन्हे दाखल केले.