अकोला शहराला ‘कोरोना’चा विळखा; चार झोनमधील सात प्रभागांमध्ये संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 10:15 AM2020-05-04T10:15:15+5:302020-05-04T10:16:01+5:30
उत्तर झोनमधील प्रभाग क्रमांक ११ कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरल्याचे चित्र समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: महापालिका क्षेत्रात अवघ्या २६ दिवसांमध्ये कोरोनाचे तब्बल ४७ रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील चारही झोनमधील सात प्रभागांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरल्याचे समोर आले आहे. ही बाब लक्षात घेता मनपा प्रशासनाने संबंधित प्रभागांमध्ये सर्वेक्षण व आरोग्य तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या २६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये प्रामुख्याने महापालिकेचे शिक्षक व आशा वर्कर यांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रात उत्तर झोन अंतर्गत येणाºया प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा परिसरातील ६१ वर्षीय इसमाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर हा आकडा दिवसेंदिवस वाढतच गेला. सद्यस्थितीत शहरातील उत्तर झोनमधील प्रभाग क्रमांक ११ कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरल्याचे चित्र समोर आले आहे. दरम्यान, आज रोजी एकूण सात प्रभागांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. संबंधित रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना महापालिका प्रशासनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून, त्या सर्वांचे नमुने घेण्यात आले आहेत.
या प्रभागांमध्ये सर्वेक्षणाला प्रारंभ
पूर्व झोनमधील प्रभाग क्रमांक १३ अंतर्गत येणाºया सुधीर कॉलनी व शिवर, पश्चिम झोनच्या प्रभाग क्रमांक ८ मधील मेहरे नगर, प्रभाग क्रमांक ९ मधील खैर मोहम्मद प्लॉट तसेच प्रभाग क्रमांक १८ मधील कमला नगर भागात सर्वेक्षणाला प्रारंभ करण्यात आला आहे.उत्तर झोनमधील प्रभाग क्रमांक दोन अंतर्गत येणाºया घुसर-आपातापा मार्गावरील शंकर नगर परिसराला ‘सील’ करण्यात आले असून, त्या ठिकाणी सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू केली आहे.
प्रत्येक झोनची आता ६५ कर्मचाऱ्यांवर मदार
प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेल्या भागात सर्वेक्षण करणे व नागरिकांच्या दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी प्रशासनाने उपलब्ध कर्मचाºयांची संख्या लक्षात घेता प्रत्येक झोनसाठी आता ६५ कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. या ६५ कर्मचाºयांच्या माध्यमातून त्या-त्या प्रभागातील सर्वेक्षण व आरोग्य तपासणीची जबाबदारी संबंधित क्षेत्रीय अधिकाºयांवर सोपविण्यात आली आहे. त्याचे नियोजन क्षेत्रीय अधिकारी करतील.