कोरोना : गर्दी टाळण्यासाठी महावितरणच्या ऑनलाइन सेवांचा वापर करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 04:46 PM2020-03-17T16:46:47+5:302020-03-17T16:47:45+5:30

कोरोना विषाणूच्या संभावित प्रादुभार्वाला रोखण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.

Corona: Use online services to prevent mobilaization | कोरोना : गर्दी टाळण्यासाठी महावितरणच्या ऑनलाइन सेवांचा वापर करा!

कोरोना : गर्दी टाळण्यासाठी महावितरणच्या ऑनलाइन सेवांचा वापर करा!

Next

अकोला : राज्यात ' कोरोना विषाणूंचा ' वाढत्या प्रादुभार्वाला प्रतिबंध करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने दिलेल्या सुचनांचे कोटेकोरपणे पालन करण्यासोबत वीज ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी तसेच वीज पुरवठ्याशी संबंधित महावितरणच्या उपलब्ध सर्व आॅनलाईन सेवेचा वापर करावा असे आवाहन अकोला परिमंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार थाबंविण्यासाठी घाबरून न जाता खबरदारीचे उपाय म्हणून गर्दी टाळणे,शक्यतोवर प्रवास टाळणे , वारंवार साबणाने हात धूने गरजेचे असतांना वीज बिल भरण्यासाठी महावितरणच्या ग्राहकांनी सार्वजनिक वाहनातून प्रवास करत महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्रावर रांगेत ताटकळत उभे राहून वेळ, पैसा खर्च करत गर्दी करण्यापेक्षा महावितरणच्या आठवड्यातील ७ ही दिवस २४ तास उपलब्ध्द आॅनलाईन सेवेचा घरबसल्या वापर करून वीज बिलांचा भरणा केल्यास कोरोना विषाणूच्या संभावित प्रादुभार्वाला रोखण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे. याशिवाय नविन वीज जोडणीसाठी अर्ज करणे यासह वीज पुरवठ्याशी संबंधित सुविधेबाबत तक्रार दाखल करण्याचीही आॅनलाईन सुविधा उपलब्ध असल्याने वीज ग्राहकांनी जाणिवपूर्वक काळजी घेणे गरजेचे आहे.

संकेतस्थळ, अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध
वीज बिल भरण्यासाठी,नविन वीज जोडणीसाठी अर्ज करण्यासाठी , वीज पुरवठ्याशी संबंधित तक्रार दाखल करण्यासाठी महावितरणच्या ग्राहकांनी अधिकृत संकेतस्थळावर तसेच महावितरण मोबाईल अ‍ॅपवरून सर्व लघुदाब ग्राहकांना डेबिट कार्ड , क्रेडिट कार्ड ,नेटबँकीग,मोबाईल वॅलेट तसेच कॅश कार्डचा वापर करून वीजबिल भरता येते. याशिवाय विविध आॅनलाईन सुविधेबाबत महावितरणच्या संकेतस्थळावरील कंझुमर पोर्टल या विभागात ग्राहकांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. याव्यतीरिक्त महावितरणच्या ग्राहकांना १८००-१०२-३४३५ / १८००-२३३-३४३५ /१९१२ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून आपली तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध्द आहे.

 

Web Title: Corona: Use online services to prevent mobilaization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.