कोरोना लस घेतलेला कर्मचारी पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:33 AM2021-02-18T04:33:40+5:302021-02-18T04:33:40+5:30
कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता शासनाने कोरोना वॅक्सिन लसीकरण सुरू केले आहे. अकोट ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रथम कोरोनाचे लसीकरण करून घेतले. ...
कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता शासनाने कोरोना वॅक्सिन लसीकरण सुरू केले आहे. अकोट ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रथम कोरोनाचे लसीकरण करून घेतले. अकोट तालुक्यातील अधिकारी- कर्मचारी, आरोग्य यंत्रणेसह शासकीय सेवेतील लोकांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येत आहे. तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला ११ फेब्रुवारी रोजी लस देण्यात आली. त्यानंतर या कर्मचाऱ्याला अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी कोरोना तपासणीसाठी घशातील स्रावाचे नमुने दिले. त्यानंतर या कर्मचाऱ्यांचा १२ फेब्रुवारी रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आहे. अकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कोरोनाची चाचणी करण्यापूर्वीच लस घेतल्यानंतर कर्मचारी-अधिकारी बेफिकीर होत वावरले. त्यानंतर आता लस घेतलेला कर्मचारीच कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. लसीकरण झालेलेसुद्धा पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत भर घालत आहेत.
विशेष म्हणजे, कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असताना अकोट ग्रामीण रुग्णालयातील काही डॉक्टर कोरोनाबाबत जनजागृती व रुग्णांचे समाधान करण्यात यशस्वी ठरले आहेत.