कवठा सोपीनाथ येथे कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:18 AM2021-04-02T04:18:40+5:302021-04-02T04:18:40+5:30
कुरूम : प्राथमिक आरोग्य केंद्र, जामठी बु. कार्यक्षेत्रातील कवठा सोपीनाथ येथे कोरोना लसीकरण मोहिमेचा बुधवारी (दि. ३१) स्थानिक ग्रामपंचायत ...
कुरूम : प्राथमिक आरोग्य केंद्र, जामठी बु. कार्यक्षेत्रातील कवठा सोपीनाथ येथे कोरोना लसीकरण मोहिमेचा बुधवारी (दि. ३१) स्थानिक ग्रामपंचायत सभागृहात प्रारंभ करण्यात आला.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मोहन रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली कवठा सोपीनाथ सरपंच अतुल बाजड यांच्या हस्ते कोरोना लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. सर्वप्रथम माजी सरपंच सुभाष नारायण बाजड (६५) यांना कोरोना लसीचा डोज देऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
लसीकरण मोहिमेत ३१ मार्च रोजी ६० वर्षांवरील १८ व १ एप्रिल रोजी ४५ वर्षांवरील २९ असे एकूण ४७ नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात आले. तसेच १० नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली.
यावेळी आरोग्य अधिकारी डॉ शिवम हरणे, आरोग्य सहा.जयश्री घुगे, आरोग्यसेवक मंगेश सरोदे, गटप्रवर्तक रंजना थोरात, आशा वंदना खडसे, मदतनीस सुनीता गवई उपस्थित हाेते.
यावेळी लसीकरण मोहिमेला ग्रामसेवक प्रफुल्ल चव्हाण, तलाठी विशाल काटोले, सामाजिक कार्यकर्ते अमोल वडतकर यांनी सहकार्य केले.