वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसींचा तुटवडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:16 AM2021-04-26T04:16:54+5:302021-04-26T04:16:54+5:30

या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जवळपास २५ ते ३० गावे जोडली असून, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, सर्व ४५च्या वरील वयोगटातील ग्रामस्थांना ...

Corona vaccine shortage in Wadegaon Primary Health Center! | वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसींचा तुटवडा!

वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसींचा तुटवडा!

Next

या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जवळपास २५ ते ३० गावे जोडली असून, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, सर्व ४५च्या वरील वयोगटातील ग्रामस्थांना कोरोनाची लस घेणे आवश्यक आहे. परंतु शुक्रवारपासून आरोग्य केंद्रात वृद्धांना कोरोना लस उपलब्ध नाही, असे सांगून परत करण्यात येत असल्याचे चित्र आहे. भरउन्हात वृद्धांना आरोग्य केंद्रात चकरा माराव्या लागत आहेत. लस उपलब्ध नसल्याने, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य समितीने याकडे लक्ष देऊन वाडेगाव आरोग्य केंद्रात लसी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारणा केली असता सोमवारपासून लस देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

Web Title: Corona vaccine shortage in Wadegaon Primary Health Center!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.