कोरोना : रिकव्हरी रेटमध्ये विदर्भ आघाडीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:22 AM2021-08-23T04:22:04+5:302021-08-23T04:22:04+5:30
अशी आहे रिकव्हरी रेटची स्थिती जिल्हा - रिकव्हरी रेट अकोला - ९७.५ अमरावती - ...
अशी आहे रिकव्हरी रेटची स्थिती
जिल्हा - रिकव्हरी रेट
अकोला - ९७.५
अमरावती - ९८.२
भंडारा - ९८.१
बुलडाणा - ९९
चंद्रपुर - ९८
गडचिरोली - ९७.६
गोंदिया - ९८.६
नागपूर - ९८.१
वर्धा - ९७.६
वाशिम - ९८.५
यवतमाळ - ९७.६
विदर्भात डेल्टा प्लसचा धोका कायम
मध्यंतरी विदर्भात अकोल्यासह नागपूर जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले होते, मात्र हे रुग्ण सद्यस्थितीत ॲक्टिव्ह रुग्ण नसून ठणठणीत असल्याची माहिती आहे. असे असले तरी राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यांतर्गत सर्वच वाहतूक सुरू असल्याने विदर्भातही डेल्टा प्लसचा धोका नाकारता येत नाही.
विभागात कोविडच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी आहे. ही स्थिती चांगली असली, तरी कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. नागरिकांनी कोविड नियमावलीच्या त्रिसूत्रीचे पालन करावे. ज्यांनी लस घेतली नाही, अशांनी कोविड प्रतिबंधक लस घ्यावी.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ