CoronaVirus in Akola : आणखी १२ रुग्ण वाढले, सात कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:03 PM2020-07-16T12:03:00+5:302020-07-16T12:04:23+5:30
आणखी १२ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १९५५ झाली आहे.
अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराची लागण होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. गुरुवार, १६ जुलै आणखी १२ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १९५५ झाली आहे. तर सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत २२० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी सकाळी ३८३ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित ३७१ अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळी पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्यांमध्य १० पुरुष व दोन महिला आहेत. यामध्ये मुर्तिजापूर येथील सहा जण, अकोट येथील पाच, तर अकोल्यातील जेतवन नगर येथील एकाचा समावेश आहे. या १२ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांमुळे अकोला जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १९५५ वर गेली आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी कोविड केअर सेंटर मधून सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १६३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, ९८ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्या २२० जणांवर उपचार सुरु आहेत.
प्राप्त अहवाल-३८३
पॉझिटीव्ह- १२
निगेटीव्ह- ३७१
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १९३४+२१= १९५५
मयत-९८(९७+१)
डिस्चार्ज- १६३७
दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)- २२०