कोरोनाचे सावट; यंदाही पोळा सण घरीच करावा लागणार साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:41 AM2021-09-02T04:41:51+5:302021-09-02T04:41:51+5:30
माजी आमदार तुकाराम भाऊ बिरकड यांच्या नेतृत्वात शेतकरी सन्मान सोहळा व उत्कृष्ट बैल सजावट स्पर्धेचे आयोजक अनिल मालगे, ...
माजी आमदार तुकाराम भाऊ बिरकड यांच्या नेतृत्वात शेतकरी सन्मान सोहळा व उत्कृष्ट बैल सजावट स्पर्धेचे आयोजक अनिल मालगे, जुने शहरातील कास्तकार गजानन वानखडे, गोपाल मांडेकर, ॲड.लखन बडदिया, सुरेश मनोहर भिरड, शेख नजीर (राजू खान), प्रा.सदाशिव शेळके अनिल कुटाफळे, अजय जागीरदार, प्रमोद वानखडे, रामेश्वर वानखडे, दिलीप शेठ भगत, राजेंद्र गोतमारे, रवि भाकरे आदींनी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांची भेट घेऊन पोळा साजरा करू देण्याबाबत निवेदन दिले, परंतु कोरोनामुळे पोळा सार्वजनिकरीत्या साजरा करता येणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जुने शहरातील पोळा चौकात साजरा होणारा शेतकरी सन्मान सोहळा तथा उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धा यंदाही होणार नसून, कोणीही पोळा चौकात आपल्या बैलजोड्या घेऊन न येता, हा सण आपल्या आपल्या घरी साजरा करावा, असे आवाहन शेतकरी सन्मान सोहळा व शेतकरी उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजक अनिल मालगे यांनी केले आहे.