पोळ्यावरही कोरोनाचे सावट; सार्वजनिक उत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 06:14 PM2020-08-12T18:14:46+5:302020-08-12T18:16:33+5:30

यंदा अकोला शहरात होणारा सार्वजनिक पोळ्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

Corona's bite on the Pola; Public celebration canceled | पोळ्यावरही कोरोनाचे सावट; सार्वजनिक उत्सव रद्द

पोळ्यावरही कोरोनाचे सावट; सार्वजनिक उत्सव रद्द

Next

अकोला : इतर सणाप्रमाणेच बळीराजाच्या पोळ्यावरही कोरोनाचे सावट असून, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शेतकऱ्यांनी आपआपल्या घरीच पोळा साजरा करावा, या जिल्हाधिकाºयांच्या आवाहनास प्रतिसाद देत यंदा अकोला शहरात होणारा सार्वजनिक पोळ्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
अकोला शहरातील पोळा चौक येथे दरवर्षी सार्वजनिक पोळा कार्यक्रम साजरा केला जात असतो. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर हा कार्यक्रम साजरा करण्यासाठीची परवानगी व चर्चा करण्यासाठी माजी आमदार तुकाराम बिरकड यांच्या नेतृत्वाखाली पोळा उत्सव समितीचे आयोजक अनिल मालगे, प्रा. सदाशिव शेळके, गजानन वानखडे, प्रमोद वानखडे, सुरेश मनोहर भिरड,रवींद्र मधुकर वानखडे, शेख नजीर ऊर्फ राजू भय्या, रवी भाकरे, गोपाल मांडेकर, संतोष ढवळे , विशाल मेहरे, नामदेव वानखडे, गजानन सांगे, राजेंद्र जुनगळे ,कुटाफळे ,राजेंद्र गोतमारे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम उपस्थित होते. अकोला जिल्ह्यात कोरोनाचा सुरू असलेला कहर लक्षात घेता, यावर्षी इतर सणाप्रमाणे पोळासुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी आपापल्या घरीच साजरा करावा, असे जिल्हाधिकारी यांनी भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाला सांगितले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन, शेतकºयांनी घरीच आपल्या दैवताची पूजा करावी व हा सण साजरा करावा, असे आवाहन पोळा उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
दरवर्षी जुन्या शहरातील पोळा चौकात होणारी उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धा तथा शेतकरी सन्मान सोहळा रद्द करण्यात आला असून, याठिकाणी कोणीही शेतकरी बांधवांनी आपली बैलजोडी आणू नये, तसेच नागरिकांनीही या ठिकाणी येऊ नये, अशी विनंती पोळा उत्सव समितीचे आयोजक अनिल मालगे यांनी समस्त शेतकरी बांधवांना केली आहे.

 

Web Title: Corona's bite on the Pola; Public celebration canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.