कोरोनाचा फटका; अक्षय तृतीयेला खरेदीचा मुहूर्त टळणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:18 AM2021-05-13T04:18:54+5:302021-05-13T04:18:54+5:30
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने, राज्यात संचारबंदी लागू करण्यात आहे. त्यातही रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. परिणामी, जिल्हाधिकारी यांनी ...
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने, राज्यात संचारबंदी लागू करण्यात आहे. त्यातही रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. परिणामी, जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लावले आहे, परंतु यामुळे सर्वच धर्मीयांच्या सण उत्सवावर गदा आली आहे. सोशल डिस्टन्सिंंगच्या पालनामुळे अनेक सण-उत्सव घरात साजरे करावे लागले आहे. हिंदुंचा सर्वात महत्त्वाचा सण अक्षय तृतीया कोरोनाच्या सावटाखाली साजरा होणार आहे. यात दान, मंदिरातील पूजा हवन व स्नानावर निर्बंध आले आहे, तसेच निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मेडिकल, दवाखाने सोडून सर्व व्यवसाय बंद असल्याने, या व्यवसायावर गदा आली आहे.
--बॉक्स--
अक्षय तृतीयेचे महत्त्व
वैशाख महिन्यात शुक्ल पक्षात येणारा अक्षय तृतीया सणाच्या निमित्ताने देव-पितरांना उद्देशाने ऋण फेडण्यासाठी ब्राह्मणांना दान केले जाते, हवन केले जाते, या तिथीत जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते, असे मानले जाते, तसेच या तारखेला नवीन वस्त्र, दागिने, शस्त्र, घर जागा, वाहन खरेदी केल्यास त्या कायम टिकतात, सोने खरेदी केल्यास कायम संपत्ती येतेे.
--बॉक्स--
पूजा साहित्यही मिळणार नाही!
कडक निर्बंध असल्याने शहरातील सर्व दुकाने बंद आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या पूजेसाठी लागणारे साहित्यही मिळणे अशक्य आहे. त्यामुळे अर्धवट साहित्यावर पूजा आटोपती घ्यावी लागणार आहे.
--कोट--
उन्हाळ्याच्या एप्रिल, मे महिन्यात इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची मोठ्या प्रमाणात विक्री होते. यामध्ये अनेक जण अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधतात. मात्र, मागील वर्षी लॉकडाऊन व या वर्षी कडक निर्बंध असल्याने सर्व व्यवसाय बुडाला आहे.
- भिकमचंद अग्रवाल, इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिक
--कोट--
दरवर्षी अक्षय तृतीयेला नागरिक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात, परंतु या वर्षी कडक निर्बंधांमुळे सर्व दुकाने बंद आहे. त्यामुळे व्यवसायाला मोठा फटका बसणार आहे. मागील वर्षीही अक्षय तृतीयेला विक्री करता आली नव्हती.
- नंद आलीमचंदानी, सराफा व्यावसायिक
--कोट--
अक्षय तृतीया व गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोटारसायकलची मोठ्या प्रमाणात विक्री होते. मागील वेळेस नुकसान झाले व या वर्षीही ७०-८० गाड्या विक्री होण्याची शक्यता होती, परंतु निर्बंधांमुळे व्यवसाय ठप्प झाला आहे. संपूर्ण ऑटोमोबाइल क्षेत्रामध्ये हीच स्थिती आहे.
- चेतन व्यास, ऑटोमोबाइल व्यावसायिक
--कोट--कोरोना काळात बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसला. मध्यंतरी रजिस्ट्रेशनमध्ये सूट दिल्यावर काही प्रमाणात फ्लॅट विक्री झाली, परंतु पुन्हा निर्बंधांमुळे गंभीर परिस्थिती झाली आहे. दरवर्षी अक्षय तृतीयेला ५-१० फ्लॅट, ड्युप्लेक्स विकल्या जातात. मात्र, या वर्षी एकाही व्यक्तीचा विचारपूस करण्यासाठीही फोन आला नाही.
- किशोर मलानी, बांधकाम व्यावसायिक