ग्रामीण भागात कोरोनाचा कहर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:17 AM2021-05-22T04:17:29+5:302021-05-22T04:17:29+5:30

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग तीव्र झाल्याचे गत आठवडाभरात दिसून आले. मागील सात दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचे ४ हजार ५२२ रुग्ण ...

Corona's havoc in rural areas! | ग्रामीण भागात कोरोनाचा कहर!

ग्रामीण भागात कोरोनाचा कहर!

Next

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग तीव्र झाल्याचे गत आठवडाभरात दिसून आले. मागील सात दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचे ४ हजार ५२२ रुग्ण आढळून आले. त्यापैकी १ हजार ६९५ रुग्ण महापालिका क्षेत्रातील, तर २ हजार ८२७ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात रुग्णवाढीचा दर दुप्पट असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. हाच दुपटीचा वेग मृत्यूच्या बाबतीतही कायम आहे. मागील सात दिवसांत जिल्ह्यात १३९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, यामध्ये महापालिका क्षेत्रात ४८, तर ग्रामीण भागातील ९१ रुग्णांचा समावेश आहे.

दिवस - पॉझिटिव्ह - मृत्यू

७ - ४,५२२ - १३९

अशी आहे स्थिती

पॉझिटिव्ह (कंसात मृतांची संख्या)

तारीख - शहरी - ग्रामीण - मृत्यू १३ मे - २३२ (४ ) - ५२४ ( १०) - १४

१४ मे - २७४ ( ५) - ३८५ ( ८) - १३

१५ मे - २१४ (४ ) - ३०९ (२३ ) - २७

१६ मे - २२० (९ ) - ३१७ ( ८) - १७

१७ मे - १५२ (६ ) - ३०७ (१३ ) - १९

१८ मे - २१९ (३ ) - २०६ (१३ ) - १६

१९ मे - १८३ (८) - ३१० (७) - १५

२० मे - २०१ (९) - ४६९ (९) - १८

कोविड फैलावाची कारणे

अनेक जण दुखणे अंगावर काढतात

कोविड चाचणीला उशीर

रुग्णालयात दाखल होण्याची भीती

चाचण्या झाल्या, तरी अहवाल मिळेना

अनेक जण घरीच घेताहेत उपचार

ग्रामीण भागात हे आवश्यक

कोविड चाचण्यांचा वेग वाढविणे

कोविडसंदर्भात जनजागृती

लसीकरणाचा वेग वाढविणे

ग्रामीण भागातच उपचाराची सुविधा उपलब्ध करून देणे

Web Title: Corona's havoc in rural areas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.