कोरोनाची धास्ती: न्यायालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची होणार तपासणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 03:37 PM2020-06-17T15:37:16+5:302020-06-17T15:37:32+5:30
न्यायालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा व सत्र न्यायालयात दोन लिपिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर न्यायालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. जी. खोब्रागडे यांच्या आदेशाने आरोग्य विभागाला पत्रही देण्यात आले आहे, तसेच न्यायालयातील काही परिसर तत्काळ सील करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे न्यायालयातही कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर काही परिसर सील करण्यात आला नव्हता, तसेच हा परिसर सील करून न्यायालयातील अधिकारी व कर्मचाºयांची आरोग्य तपासणी करण्याची गरज असल्याचे वृत्त लोकमतने दिले होते. त्यानंतर योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले असून, प्रत्येक कर्मचाºयाची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे, तसेच न्यायालयात येणाºया प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग केल्यानंतरच न्यायालय इमारतीत प्रवेश देण्यात येत आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय.जी. खोब्रागडे यांनी तातडीने प्रशासनाला सूचना दिल्या असून, त्या सूचनेनुसार संबंधित लिपिकांची जागा सील करण्यात आली आहे, तसेच या कर्मचाºयांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणीही आरोग्य विभाग तसेच महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. सध्या न्यायालयीन कामकाज दोन शिफ्टमध्ये सुरू आहे. सकाळी दहा ते दुपारी एक आणि दुपारनंतर अडीच ते पाच वाजेदरम्यान न्यायालय सुरू आहेत. न्यायालयांमध्ये वकिलांची संख्यासुद्धा कमी दिसून येत आहे. ज्यांचे प्रकरण बोर्डवर असेल तेच संबंधित वकील हे न्यायालयात उपस्थित राहतील, अशा सूचनाही करण्यात येत आहेत. कोरोनासंदर्भात सर्वोच्च न्यायालय तथा मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व सूचनेनुसार कोरोनासंदर्भात नियमांचे पालन जिल्हा व सत्र न्यायालयात करण्यात येत असल्याचेही आता दिसून येत आहे.