CoronaVirus : अकोल्यात आणखी १७ रुग्ण वाढले; रुग्णसंख्या २७८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:59 AM2020-05-19T11:59:48+5:302020-05-19T12:27:56+5:30
मंगळवार, १९ डिसेंबर रोजी यामध्ये आणखी १७ जणांची भर पडली आहे.
अकोला : कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी अकोला जिल्ह्यात दोन दिवसांचा संपूर्ण ‘लॉकडाउन’लागू झाला असताना, कोरोनाबाधितांची संख्या मात्र कमी होण्याची कोणतीही चिन्हे नसून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच आहे. मंगळवार, १९ डिसेंबर रोजी यामध्ये आणखी १७ जणांची भर पडली आहे. मंगळवारी प्राप्त झालेल्या २०० अहवालांपैकी १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७८ वर पोहचली आहे. दरम्यान, सोमवारी रात्री २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत ११६ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
विदर्भात नागपूरनंतर अकोला शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोनाबाधितांची संख्या दिवसाकाठी दुहेरी आकड्याने वाढत आहे. मंगळवारी २०० अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १८३ निगेटिव्ह, तर १७ पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांमध्ये १० पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. यामध्ये चार जण हे भीम चौक अकोट फैल येथील आहेत. तर उर्वरित रुग्ण हे सोनटक्के प्लॉट जुने शहर, सिंधी कॅम्प, मुजप्फरनगर लकडगंज, आंबेडकरनगर- बसस्टँड मागे, फिरदौस कॉलनी, दगडी पूल, बैदपूरा, आदर्श कॉलनी-सिंधी कॅम्प, अकोली बुद्रुक- गीतानगर, हाजीनगर- अकोट फैल, व्हीएचबी कॉलनी- रतनलाल प्लॉट, मोमीनपुरा -ताजनापेठ, रंगारहट्टी बाळापुर येथील रहिवासी आहेत. या नव्या पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडल्याने एकूण रुग्णांची संख्या २७८ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका कोरोनाबाधिताची आत्महत्या आहे. तर आतापर्यंत १४४ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे सद्या ११६ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
सोमवारी रात्री २३ जणांना डिस्चार्ज
सोमवारी रात्री आणखी २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. या सर्वांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. यातील आठ जण खैर मोहम्म्द प्लॉट येथील, तर तीन जण आंबेडकर नगर, तीन जण रामनगर सिव्हील लाईन्स येथील आहेत. उर्वरीत जुना आळशी प्लॉट, माळीपुरा, फिरदौस कॉलनी, गोकुळ कॉलनी, तारफैल, भीमनगर, सराफा बाजार, जुनी शहर पोलीस चौकी, अकोट फैल या भागातील रहिवासी आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत १४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
प्राप्त अहवाल-२००
पॉझिटीव्ह-१७
निगेटीव्ह-१८३
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - २७८
मयत-१८(१७+१),डिस्चार्ज - १४४
दाखल रुग्ण(अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह) - ११६