CoronaVirus : रुग्णवाढीचे सत्र सुरुच; २४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:23 PM2020-07-25T12:23:55+5:302020-07-25T12:24:14+5:30
शनिवार, २५ जुलै रोजी आणखी २४ पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २३७८ वर गेली आहे.
अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नानाविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी, जिल्ह्यात रुग्णवाढीचे सत्र सुरुच आहे. शनिवार, २५ जुलै रोजी आणखी २४ पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २३७८ वर गेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून बुधवारी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे १६५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २४ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४१ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये १० महिला व १४ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये एकट्या अकोट शहरातील तब्बल १२ जणांचा समावेश आहे. याशिवाय अकोल्यातील शास्त्री नगर भागातील दोन, रामनगर भागातील दोन, केशव नगर भागातील दोन जणांसह बाभूळगाव ता. बाशीर्टाकळी, जेल क्वार्टर, तेल्हारा, गुरुप्रीतनगर, आळशीप्लॉट येथील प्रत्येकी एका जणासही कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून समोर आले आहे.
३७३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २५७८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी १९०६ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३७३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.