CoronaVirus : अकोला जिल्ह्यात आणखी २७ पॉझिटिव्ह रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 12:50 PM2021-01-05T12:50:19+5:302021-01-05T12:50:45+5:30
CoronaVirus News २७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या १०,६५७ वर पोहोचली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरानाचा कहर सुरुच असून, मंगळवार, ५ जानेवारी रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी २७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या १०,६५७ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ८५१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ८२४ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये डाबकी रोड येथील चार, जठारपेठ, कौलखेड व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी दोन, शास्त्री नगर, श्रीराम चौक, जूने शहर, न्यु खेतान नगर, सावकार नगर, रजपूतपुरा, खडकी, राधे नगर, अकोट, बाळापूर नाका, मुर्तिजापूर, गीता नगर, खडकी, राम नगर, छोटी उमरी, रणपिसे नगर व सिव्हील लाईन येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
४९२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,६५७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,८४२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४९२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.