CoronaVirus in Akola : दिवसभरात १ मृत्यू; ३३ पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण ३४१ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 06:17 PM2020-05-21T18:17:20+5:302020-05-21T18:18:42+5:30

गुरुवार, २१ मे रोजी यामध्ये दिवसभरात तब्बल ३३ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.

Coronavirus in Akola: 1 death in a day; 33 positive; Total patients at 341 | CoronaVirus in Akola : दिवसभरात १ मृत्यू; ३३ पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण ३४१ वर

CoronaVirus in Akola : दिवसभरात १ मृत्यू; ३३ पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण ३४१ वर

Next
ठळक मुद्देअकोट फैल येथील ६८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.सकाळी १६ तर सायंकाळी १७ अशा ३३ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली.सद्यस्थितीत १२९ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अकोला: अकोल्यात कोरोनाच्या संक्रमणाने घेतलेला सुसाट वेग कमी होण्याची कोणतीही चिन्हे नसून, अख्खे शहरच या विषाणूने कवेत घेतले आहे. कोरोनाबाधीतांच्या संख्येन बुधवारी ३०० चा टप्पा ओलांडल्यानंतर गुरुवार, २१ मे रोजी यामध्ये दिवसभरात तब्बल ३३ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर बुधवारी भीमचौक अकोट फैल येथील ६८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ३४१ वर पोहचला आहे. तर मृतकांचा आकडाही २१ झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
विदर्भात नागपूरनंतर अकोला शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. शहर व जिल्हा मिळून बुधवार २० मे रोजी ३०० चा टप्पा ओलांडत बाधितांची संख्या ३०८ झाली. यामध्ये गुरुवारी सकाळी १६ तर सायंकाळी १७ अशा ३३ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून दिवसभरात प्राप्त १७३ अहवालांपैकी ३३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरित १४० अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये १९ पुरुष व १४ महिलांचा समावेश आहे. गुरुवारी सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये रेल्वे कॉलनी जठारपेठ येथील तीन जण, फिरदौस कॉलनी येथील दोन, डाबकी रोड येथील दोन, नायगाव येथील दोन, तर रजपूतपुरा, ज्योतीनगर सिव्हिल लाईन्स, न्यू राधाकिसन प्लॉट, गोरक्षण रोड, सोनटक्के प्लॉट, पुरपिडीत कॉलनी अकोट फैल, लक्ष्मीनगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या १७ जणांमध्ये सोनटक्के प्लॉट जुने शहर येथील तीन जण, जोगळेकर प्लॉट डाबकीरोड येथील चार जण, तर रेवतीनगर बाळापुरनाका डाबकीरोड, देशमुख फैल, डाबकीरोड, अकोट फैल, सावंतवाडी, सिव्हील लाईन्स, जुने शहर, लकडगंज रामदास पेठ, मोमीनपुरा, आंबेडकर नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी एकाने आत्महत्या केल्याची नोंद आहे. तर १९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत १२९ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-३४१
मयत-२१(२०+१),डिस्चार्ज-१९१
दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२९

 

Web Title: Coronavirus in Akola: 1 death in a day; 33 positive; Total patients at 341

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.